*जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतली होड्री परिसरातील नागरिकांच्या निवेदनाची दखल*
*तात्काळ निवेदनाची दखल घेतल्यामुळे होड्री वासियांनी व्यक्त केला आनंद*
विशेष प्रतिनिधि – श्रीकांत दुर्गे
भामरागड :- तालुक्यातील ग्रा.पं. होड्री अंतर्गत होड्री नदीवर बेलिब्रिजचे काम थंडबस्त्यात पडल्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आज जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे आपली व्यथा मांडायला आले होते. त्यानुसार जि.प. अध्यक्षांकडे निवेदनही सादर केले. होड्री परिसरातील जनतेच्या समस्यांच्या निवेदनाची दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराशी दूरध्वनीवरून संपर्क करून तात्काळ होड्री नदीवरील बेलिब्रिजचे काम सुरु करण्याचे निर्देश जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिले. त्यानुसार कंत्राटदारानेही त्यांना प्रतिसाद देत होड्री नदीवरील बेलिब्रिजचे काम दसऱ्या नंतर लगेच सुरु करण्याचे आश्वासन दिले.
जि.प. अध्यक्षांनी तात्काळ निवेदनाची दखल घेत परिसरातील नागरिकांच्या समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न केले. जि.प. अध्यक्षांच्या या कार्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
सदर निवेदन देतांना ग्रा.पं. होड्रीतील फकरी तिम्मा, सोमजी विडपी, रामा मिच्चा, कोमटी डोलू विडपी, अजय विडपी, भिका विडपी, कोलु विडपी, चैतु विडपी, मधुकर गावडे, मनोज तिम्मा, देवू गावडे, रामा वडडे, विनू वडडे, अनिल गावडे, आकाश विडपी, संतोष विडपी, प्रकाश विडपी, हेमंत विडपी, दिलीप तिम्मा, सुधाकर विडपी ग्रामपंचायतीचे नागरिक उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज