*भरधाव ट्रक नालीत अडकल्याने मोठे अनर्थ टळले*
*सावनेर प्रतिनिधि-सुरज सेलकर*
*सावनेरःसावनेर पासुन 7की.मी.अंतरावर असलेल्या कोदेगाव येथे आज सकाळच्या दरम्यान भरधाव ट्रक वरुण चालकाचे नियंत्रण अचानक सुटले व ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या नालीच्या कडा तोडत नालीत अडकल्याने मोठा अनर्थ टळला*
*मिळालेल्या माहितीनुसार सावनेर तालुक्यातील खापा पो.स्टे.हद्दीतील कोदेगाव येथे पाहटेच्या सुमारास भरधाव ट्र्क वरुण चालकाचे नियंत्रण सुटले व धावता ट्रक अनियंत्रीत होऊण रस्त्याच्या बाजुला असलेल्या नालीची वरची सुरक्षा भिंत तोडून अडकल्याने बाजूलाच असलेल्या घरावर पलटन्या पासून बचावला तर प्रत्यक्षदर्शीच्या मते ट्रक खाली असल्याने ही मोठी दुर्घटना टळली ट्रकमधे भारी साहित्य असते तर त्यानीही घराला नुकसानहोउण जिवीत हानीची शक्यता बळावली असती.*
*सदर घटनेची खापा पो.स्टे.ला नोंद करुण पुढील तपास खापा पोलीस करत आहे.*