*नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात*

*एक जागेवर ठार तर एक किरकोड जखमी*
रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी सह विक्रम श्रीरामे
देवलापार – पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नागपूर जबलपूर महामार्गावर पवनी येथे सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास मागेहुन येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने समोर जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने मागे बसलेल्या व्यक्तीचे तोल जाऊन त्या व्यक्तीच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्याचा घटनास्थळी मृत्य झाल्याची घटना समोर आली आहे.मृतक नामे मुश्ताक अय्यूम अन्सारी वय 40 वर्ष. रा.कामठी असे असून सोबत असलेले दुचाकी चालक मुश्ताक किम खान वय 45 वर्ष.रा.अरविंदनगर,कामठी रोड असे असून दुचाकी चालक किरकोड जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.प्राप्त माहिती नुसार कामठी येथील रहिवासी आपल्या दुचाकी क्र.MH-40 V 9411 ने शिवणी जबलपूर येथे आपल्या आईला भेटायला जात असल्याचे समजले.वाटेतच पवनी येथे महामार्गाच्या कडेला बिघाड अवस्थेत एक ट्रक उभे होते.याच ट्रक ला दुचाकी ओव्हरटेक करत असताना मागेहून जोरदार वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रक ने दुचाकी ला धडक दिली.

यात मागे बसून असलेल्या मृतक मुश्ताक अन्सारी याचा दुचाकी वरून तोल जाऊन धडक देणाऱ्या ट्रकच्या मागच्या टायरखाली गेल्याने डोक्यावरून टायर गेल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यू झाली.सदर घटनेची माहिती ओरिएंटल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना व पोलीस स्टेशन देवलापार यांना देण्यात आली.ओरिएंटल कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर अंबुलेन्स घटनास्थळी पाठवून पोलिसांच्या मदतीने मृत व्यक्तीला व जखमी व्यक्तीस शासकीय ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे नेण्यात आले.मृत व्यक्तीचे शव विच्छेदन देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात होणार असल्याचे समजते.व जखमी व्यक्तीचे उपचार सुरू असल्याचे समजते.बिघाड अवस्थेत रस्त्याच्या कडेला वाहन उभे केलेल्या वाहनावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून अज्ञात आरोपी वाहनाचे शोध सुरू असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे.मोटर व्हेईकल कायद्याअंतर्गत कलम 304-अ.भा.द.वी.284 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे..यात ओरिएंटल कर्मचारी डॉ.हनवत सर,पेट्रोलिंग ऑफिसर लोखंडे जी.पांढुरंग वाघाडे, गणेश बघमारे यांचे विशेष योगदान असल्याचे समजते.
Maharashtra News Media सच की आवाज