Breaking News

*काटोल तालुका जेष्ठ नागरीक मंडळाचे वतीने जागतिक जेष्ठ नागरीक दिन महोत्सव-2021 संपन्न*

*काटोल तालुका जेष्ठ नागरीक मंडळाचे वतीने जागतिक जेष्ठ नागरीक दिन महोत्सव-2021 संपन्न*

काटोल – तालुका जेष्ठ नागरीक मडंळाचे वतीने डाॅ आंबेडकर गार्डन येथील नगर परीषद काटोल द्वारा बाधुंन दिलेल्या “विरंगुळा केंद्र” येथे जागतिक जेष्ठ नागरीक दिन महोत्सवाचे आयोजन दि.10 ऑक्टोबर 2021 करण्यात आले होते. यावेळी 250 जेष्ठांची उपस्थिती लाभली होती.
महोत्सवाचे अध्यक्षस्थानी फेस्काम नागपुर चे अध्यक्ष श्री बबनराव वानखेडे, तर उद्घाटक न.प.काटोल चे सत्तापक्ष नेते श्री चरणसिंगजी ठाकुर, प्रमुख अतिथी नगराध्यक्षा सौ वैशालीताई ठाकुर, ल.भु.क.म. कोढांळी चे जेष्ठ पर्यवेक्षक तथा मंथन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुधीरजी बुटे, सामाजिक कार्यकर्ते श्री शामरावजी वानखेडे , त्याशिवाय फेस्काम नागपुर चे सचिव श्री रत्नाकर राऊत, जे.ना.म.चे अध्यक्ष श्री रमेश तिजारे, उपाध्यक्ष श्री शामरावजी झामडे, सचिव श्री गजानन भोयर, जे.ना.म.कोढांळी चे अध्यक्ष श्री रामदास सहारे, मंडळाच्या जेष्ठ सदस्य व देणगीदात्या श्रीमती निर्मलाताई कोंडे मंचावर उपस्थित होते.
मा.चरणसिंगजी ठाकुर यांनी द्वीप प्रज्वलीत व सरस्वती मातेचे पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाची सुरुवात “खरा तो एकचि धर्म ” या सामुदायिक प्रार्थनेने झाली.
सर्व सन्माननीय पाहुण्यांचा परिचय करून पुष्पगुच्छ- शाल श्रीफळ सत्कार करण्यात आला. कोढांळी येथील मंडळांची सर्वोत्कृष्ट मडंळ म्हणून निवड करून अध्यक्ष श्री रामदासजी सहारे यांना स्व.मारोतराव कोंडे यांचे स्मृती स्मरणार्थ पुष्पगुच्छ-शाल व रू501/-चा रोख पुरस्कार तसेच सन्मानपत्र देवुन सत्कार करण्यात आला.
मंडळाच्या देणगीदात्या श्रीमती निर्मलाताई कोंडे यांचा सुध्दा पुष्पगुच्छ-शाल देवुन सत्कार करण्यात आला. त्याशिवाय ग्रामीण मडंळाचे श्री रामराव कोरडे , धनराज कुकडे, महादेवराव नखाते व वरीष्ठ सदस्य श्री नत्थुजी भाजीखाये यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.
उद्घाटनपर भाषणातुन श्री चरणसिंगजी ठाकुर यांनी मंडळाच्या कार्याची प्रशंसा करून सर्वतोपरी मदत करण्याचे तसेच पारडसींगा येथे जेष्ठासांठी विरगुंळा केंद व निराधार जेष्ठासांठी वेगवेगळ्या कुटी बाधुंन देण्याचे सूतोवाच केले.
मडंळाचे सचिव श्री गजाननराव भोयर यांनी सादर केलेल्या प्रास्ताविकातुन मडंळाचे कार्याची माहिती तसेच दि.9.7.2018 च्या शासन निर्णयानुसार प्रशासनाकडुन काय अपेक्षित आहे, दि. 31.10.2019 शासन निर्णयानुसार समन्वय सनियंत्रण समीतीचे गठन करून त्यावर दोन जेष्ठांना सभासदत्व घ्यावयाचे आहे. परंतु प्रत्यक्षात प्रशासनाने यासंबधात काहीच कार्यवाही केली नाही,असे सांगितले.
नागपूर विभागात फक्त काटोल येथे नगर परिषद कडुन सर्वप्रथम विरंगुळा केंद्र मडंळास बाधुंन मिळाले . याचे श्रेय श्री चरणसिंगजी ठाकुर यांना जाते.त्याबद्दल मडंळाचे सचिव श्री गजाननराव भोयर यांनी त्यांचे आभार मानले. उपस्थितांनी टाळ्या वाजवून साद दिली. या श्रेयासाठी फेस्काम नागपुर तर्फे अध्यक्ष श्री बबनराव वानखेडे यांनी श्री चरणसिंगजी ठाकुर, मडंळाचे अध्यक्ष श्री रमेश तिजारे व सचिव श्री गजाननराव भोयर यांचा पुष्पगुच्छ-शाल देवुन सत्कार करण्यात आला.
मंडळाकडून 20 जेष्ठांचा सामुहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना पेन व पाॅकेट डायरी सप्रेम भेट देण्यात येवुन पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात.
सर्व निमंत्रितानी मनोगत व्यक्त केले. मडंळाचे अध्यक्ष श्री रमेश तिजारे यांनी नाविन्यपुर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मडंळाचे सचिव श्री गजाननराव भोयर यांनी केले तर आभार उपाध्यक्ष श्री शामरावजी झामडे यांनी मानले. पसायदानाच्या गायनाने
कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सहसचिव श्री अरुण पुंड. संघटन सचिव श्री दुधाने, कोषाध्यक्ष श्री रूपराव राऊत, संचालक सर्वश्री
मोतीराम वंजारी, हितेंद्र गोमासे, रत्नाकर बोदंरे, संतोषराव धुर्वे व श्रीमती दुर्गाताई कडू तसेच देणगीदारांचे विशेष सहकार्य लाभले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …