*पिपरी शेतातील घरातुन ६० हजार रूपयाच्या शेती साहित्याची चोरी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन पासुन पश्चिमेस ३ किलो .मीटर अंतरावर असलेल्या पिपरी शेत शिवारातील पवन ईखार यांच्या शेत घराच्या दाराचे कुलुप तोडुन आत ठेवलेले रोटावेटरचे दोन सेट व मशीनचे ४ फास अशा एकुण साठ हजार रूपयाच्या शेती साहित्य अज्ञात चोराने चोरून नेल्याने शेतकरी पवन ईखार यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
सोमवार दिनांक.११ ऑक्टोंबर ला दुपारी १ ते ३ वाजता दरम्यान पिपरी शेत शिवारात पवन रामचंद्रजी ईखार वय ३२ वर्ष राहणार. गाडेघाट यांचे शेत असुन त्याच्या शेतातील घराच्या दाराचे कोणीतरी अज्ञात इसमा ने कुलुप तोडुन आत प्रवेश करून खोलीत ठेवलेले रोटावेटरचे दोन सेट अंदाजे किंमत ५०,००० रूपये व रोटावेटर मशीन ला लागणारे फास ४ नग अंदाजे किंमत १०,००० रूपये असा एकुण ६०,००० ( साठ हजार ) रूपयाच्या शेती साहित्यांची अज्ञात आरोपी ने चोरी करून नेल्याने फिर्यादी पवन ईखार यांचे तोंडी तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरूध्द अपराध क्रमांक. ३७८/२०२१ कलम ४६१, ३८० भादंवी अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोहवा गणेश पाल पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज