*पिपरी- कन्हान व कांद्री येथे रावण दहन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – पिपरी शहरात नवरात्र महोत्सव व दसरा हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. परंतु मागील दोन वर्षापासुन राज्यात कोरोना चा प्रादुर्भावा मुळे अतिशय भंयकर स्थिती निर्माण झाल्याने शासना द्वारे या सणांवर बंदी घालण्यात आली होती. सध्याचा परिस्थितीत शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव नसल्यामुळे पिपरी-कन्हान येथे सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी द्वारे विधीवंत पुजा अर्चना करून रावण दहन करण्यात आले.
राज्यात सह शहरात गेल्या दोन वर्षापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासना द्वारे निर्बंध अटी शर्ती लागु करून विविध कार्यक्रम सण साजरा करण्यात बंदी घातली होती. परंतु सध्याचा परिस्थितीत राज्यात व शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी अस ल्यामुळे शासना द्वारे निर्बंध हटविण्यात आल्याने पिपरी-कन्हान येथील सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ द्वारे नवदुर्गा मंदीर परिसरात विधीवत पुजा अर्चना करून रावण दहन करण्यात आले.या प्रसंगी नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

*कांद्री येथे रावण दहन*
ग्राम पंचायत कांद्री अंतर्गत शिवनगर (फुकट नगर) येथे श्री राम सेना द्वारे रावन दहन करण्यात आले. याप्रसंगी सुर्यभान गौतम, रितेश प्रसाद, देवेंन्द्र शाहु , राहुल प्रसाद, अमन शर्मा, गीता चव्हान, विक्रम प्रसाद, पंकज यादव, वृंदाविशीनी रविदास, कार्तिक आदमचे सह नागरिकांनी सहकार्य केले.
Maharashtra News Media सच की आवाज