*नागपुर येथील पारडी उडानपुल कोसळला*

*कोणीही जख्मी झाले नाही – सुत्र*
*संपुर्ण कामाची तात्काळ चौकशी करा नागरिकांची मागणी*
विशेष प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
नागपूर: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निर्माणाधीन पारडी उड्डाणपुलाचा एक भाग कोसळल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे . सुदैवाने या घटनेत कोणीही जख्मी झाले नाही . अशी माहिती सुत्रान कडुन मिळत आहे . या घटने नंतर नागरिकांन मध्ये तीर्व रोष निर्माण होत असुन निर्माण झालेल्या सर्व उडानपुलाची तात्काळ चौकशी करुन दोषियांवर कारवाई करा अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे .

सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार मागील सात वर्षापुर्वी उडाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले असुन हे उडानपुल 3 वर्षात पूर्ण होणार होते . परंतु आजपर्यंत प्रलंबित असुन आता हे अगदी स्पष्ट आहे की त्याची गुणवत्ता देखील चांगली नाही. कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या भारतनगर चौकात निर्माणाधीन असलेल्या पुलाचा एक भाग मंगळवार दिनांक १९ आॅक्टोंबर २०२१ ला रात्री ८ च्या सुमारास कोसळला ची माहिती मिळाली आहे. या पुलाचा एक भाग पडण्याआधी तेथून एक चारचाकी गाडी गेल्याची माहिती मिळत आहे. या गाडीत अख्खे कुटुंब होते अशी माहिती मिळत आहे. अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने या कुटुंबियांचे प्राण वाचल्याची चर्चा येथे होत असल्याची माहिती मिळत आहे. पारडी येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे या भागातील नागरिकांसह शहरातील वाहनचालकांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. या पुलाच्या कामासाठी दुसऱ्यांदा वाढवून देण्यात आलेली मर्यादा बांधकाम पूर्ण होण्यास पुरेशी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता वर्षाअखेर पुलाचे काम पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच बांधकाम कोसळल्याने विविध प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटने नंतर नागरिकांन मध्ये तीर्व रोष निर्माण होत असुन निर्माण झालेल्या सर्व उडानपुलाची तात्काळ चौकशी करुन दोषियांवर कारवाई करा अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज