*विनयभंग*

*विनयभंग*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः पो.स्टे . सावेनर हद्दीत दि.01/09/2021 ते दि. 18/10/2021 चे 18.00 वा . दरम्यान 20 वर्षीय फिर्यादी / पीडित ही सप्टेंबर 2021 ते दि . 18/10/2021 रोजी पावेतो आरोपी नामे – सत्येन्द्र केदार दोहरे वय 23 वर्ष रा . माईन स्टोन बोरूजवाडा वार्ड क्र . 2 सावनेर याने फेसबुक वरून फिर्यादीशी मैत्री करून तिला वारंवार भेटण्यासाठी बोलावू लागला.*


*फिर्यादी यांनी आरोपीशी असलेली “मैत्री तोडून टाकून माझ्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही ” असे सांगितले असतांनाही त्याने फिर्यादीच्या फोनवर वारंवार फोन करून व मॅसेज करून तिला भेटण्यासाठी बोलावीत होता . त्यावेळी त्याच्या त्रासाला कंटाळुन फिर्यादी ही तक्रार देण्यासाठी पो स्टे ला येत असतांना आरोपीने रस्त्यात फिर्यादीस थांबवून समजूत घालून गाडीवर बसवून बोरूजवाडा हायवे रोडवर घेवून जावून त्या ठिकानी फिर्यादीस “ तु माझ्या विरूद्ध तक्रार का देते व माझ्या सोबत बोलत का नाही ” असे म्हणून फिर्यादीस त्यांची एकत्र असलेली फोटो प्रसारीत करन्याची व मारन्याची धमकी दिली*


*फिर्यादी हिने आरोपीस भेटण्यास नकार दिला असता घरी जावून लग्न करन्याची मागनी करून तिच्या मागे लागला असता फिर्यादी हिने लग्नास स्पष्टपणे नकार दिला असता तो पुन्हा वारंवार फोन करून मॅसेज करून फिर्यादीस त्रास देवू लागला . फिर्यादी हिने त्याचे मोबाईल फोन रिसीव्ह केले नाही म्हणुन आरोपी हा फिर्यादी चे घरी गेला असता त्यास पकळून ते पो स्टे ला तक्रार देन्यासाठी येत असतांना रस्त्यातच आरोपी व त्याची आई यांनी माफी मागून एक वेळेस माफ करा असे सांगून यापुढे फिर्यादी यांना कोणतेही मॅसेज करणार नाही तसेच पाठलाग करणार नाही . अशी नोटरी करून देवूनही आरोपीने मॅसेज करने सुरू ठेवले व त्रास देने सुरू ठेवले .*

*सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे . सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम 354 , 354 ए , 354 डी , 504 , 506 भादंवी . कायद्यान्वये अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . आरोपीचा शोध घेणे सुरू आहे .*

*गुन्हयाचा पुढील तपास मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार तिवारी 9689891486 हे करीत आहे .*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …