*कन्हान राम नगर लोहिया ले आऊट येथे वृक्षारोपण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत राम नगर लोहिया ले आऊट येथील नागरिकांना ऑक्सीजन ची कमतरता होऊ नये यास्तव नगरसेवक, नगरसेविका व नागरिकां च्या द्वारे खुल्या जागेत विविध प्रकारच्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
राज्यात, जिल्ह्यात व शहरात मागील दोन वर्षा पुर्वी कोरोना चे थैमान चांगलेच पसरून ऑक्सीजन च्या कमी मुळे किती तरी लोकांचा मृत्यु झाला असुन आज ही लोकांना ऑक्सीजन ची कमतरता भासत असल्यामुळे लोकांना विविध प्रकारचे आजार होत किती तरी लोकांचा मृत्यु होत आहे. सध्याच्या परिस्थि तीत शहरात व परिसरात कोरोना चा प्रार्दुभाव आटोक्यात आला असुन सुद्धा नागरिकांना ऑक्सीजन ची कमतरता होऊ नये म्हणुन वृक्ष वाढविण्यास आणि वृक्ष हे मनुष्याला मुबलक ऑक्सीजन करित असल्याने स्थानिक नगरसेवक, नगरसेविका व नागरिकांनी राम नगर लोहिया ले आऊट येथील खुल्या जागेत पिपळांचे, निंबाचे, अशोकाचे, बादामाचे वृक्ष लावुन वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद नगरसेविका गुंफाताई तिडके, नगरसेवक विनय यादव, प्रविण ईखार, संध्या लड्डा, सचिन ईखार, शुभम हातागडे सह नागरिक उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज