*जेसीबी च्या धडकेत दुचाकी चालकाच्या मृत्यू एक जखमी*

*सब्बलनाला जवळील घटना*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
खापरखेडा:- स्थानिक पोलिस स्टेशन हद्दीतील सब्बल नाल्याजवळ खापरखेडा – दहेगाव (रंगारी) मुख्य मार्गावर मार्गांवर सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जेसीबीच्या धडकेत मोटरसायकल चालकाचा मृत्यू झाला. तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली हर्षद केशव गजभिये तीस वर्ष राहणार वार्ड नंबर एक नवीन बिना, भानेगाव असे मृतकाचे नाव आहे तर जखमीचे नाव विवेक उर्फ बंटी हरिदास मेश्राम वय 28 वर्ष राहणार नवीन भानेगाव आहे. मृतक हर्षद गजभिये सोमवारी काही महत्वाच्या कामाने एका मित्रासोबत स्वतःच्या हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक एम एच 40 एए 0337 ने डबल सीट दहेगाव रंगारी येथे गेला होता. काम आटपून घरी वापस जात असताना अचानक विरुद्ध दिशेने येणाऱ्या जेसीबी क्रमांक एम एच 40 पी 95 चालकाने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकी चालकाच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने जखमीना नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळीच नऊ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान हर्षद गजभियेचा मृत्यू झाला. मृतक अविवाहित असून खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता. खापरखेडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी नागपूर शासकीय मेयो रुग्णालयात हलविण्यात आले पुढील तपास सुरू केला आहे.
Maharashtra News Media सच की आवाज