*स्थानिक ट्रान्संपोर्ट ला टोल फ्री करण्याकरिता टोल नाक्यावर भाजप ने केले धरणा आंदोलन*
*भाजप चे ओरिएंटल टोल अधिकार्यांन मार्फत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रबंधकास निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोळश्याच्या खाणी व नदीच्या वाळुचे प्रमाण असुन दिवसभरात कित्येक कोळसा व वाळुचे मालवाहक रस्त्याने दळणवळण करीत असुन राज्या बाहेर जाण्यासाठी त्यांना नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा लागत असुन कांद्री-कन्हान शिवारात ओरिएंटल टोल नाका सुरु असुन या टोल नाक्यावर ट्रान्संपोर्ट मालकांन कडुन एकुण १३६० रुपये टोल वसुल करीत असल्याने भाजपा पारशिवनी तालुका च्या पदाधिकार्यांनी बोरडा रोड कांद्री टोल नाक्यावर धरणा आंदोलन करून ओरिएंटल टोल नाक्या च्या अधिकार्यांन मार्फत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रबंधकांला निवेदन पाठवुन तात्काळ स्थानिक ट्रान्संपोर्ट ला टोल फ्री करण्याची मागणी केली आहे.

नागपुर जिल्यातील प्रमुख कोळसाच्या खाणी व कन्हान, पेंच नदी वाळुचे जास्त प्रमाण कन्हान, कांद्री, टेकाडी, गोंडेगाव व घाटरोहणा या भागात असल्याने दिवसभरात कित्येक कोळसा व वाळुचे मालवाहक ट्रक दळणवळण करीत असुन नागपुर, भंडारा, गोंदिया व राज्या बाहेर जाण्यासाठी त्यांना नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गा चा वापर करावा लागत असुन कांद्री-कन्हान शिवारात ओरिएंटल टोल नाका सुरु असल्याने ट्रान्संपोर्ट मालकांकडुन एकुण १३६० रुपये टोल वसुल केला जात आहे. त्यामुळे कित्येक ट्रक मालक हे टोल वाचविण्यासाठी शहरातील तारसा रोड चौक ते गहुहिवरा-चाचेर मार्गाने ये-जा करीत असल्याने गहुहिवरा-चाचेर मार्ग रस्ता खराब होऊन मोठ मोठे गड्डे पडल्याने येथे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन सामन्य नागरिक आपले जीव धोक्यात घालुन येणे जाणे करीत असल्याने नागरिकांनी या संबंधात प्रशासकीय तक्रारी करुन आंदोलने ही केले आहे. कन्हान- पिपरी नगरपरिषद द्वारे शहरातुन जड वाहतुक बंद करा असा प्रस्ताव ही काढण्यात आला असुन अजुन ही त्यावर काही तोडगा निघाला नसुन नेहमी प्रमाणेच स्थानिक नागरिकांना खोटे आश्वासनेच देण्यात आली. आज ही शहरातुन जड वाहतुकाची दळणवळण सुरु असल्याने भाजपा पारशिवनी तालुका पदाधिकार्यांनी तालुकाध्यक्ष अतुल हजारे, भाजपा ओबीसी आघाडी नागपुर जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुरेंन्द्र बुधे, भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक आदिं च्या नेतृत्वात बोरडा रोड कांद्री ओरिएंटल टोल नाक्यावर टोल फ्री करण्याच्या मागणी करिता धरणा आंदोलन करून ओरिएंटल टोल नाक्या च्या अधिकार्यांन मार्फत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधि करण प्रबंधकास निवेदन पाठवुन तात्काळ स्थानिक ट्रान्संपोर्ट ला टोल फ्री करण्याची मागणी केली आहे.
या प्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद नगरसेवक राजेंद्र शेंदरे, सौरभ पोटभरे, मनोज कुरडकर, पंकज गोंडाने, शेखर गिऱ्हे, सचिन वासनिक, ऋृषभ बावनकर, सचिन कांबडे, भगवान सावरकर, हॅप्पी सिंग, जितेंद्र यादव, राजेश चौधरी, दिलीप मेटे, राकेश कुमार, ऋषीशंकर शुक्ला, रामगोविंद तिवारी, माधव वैद्य, देवीप्रसाद कश्यप, कलंक प्रसाद कश्यप, विक्की तडस, सौ. स्वाती पाठक, सौ.तुलेशा नानवटकर, सुषमा मस्के सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व ट्रक चालक मालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज