Breaking News

*विद्यासागर कला महाविद्यालयात “मिशन युवा स्वास्थ्य कोरोना – 19 लसीकरण शिबिर” संपन्न*

*विद्यासागर कला महाविद्यालयात “मिशन युवा स्वास्थ्य कोरोना – 19 लसीकरण शिबिर” संपन्न*

रामटेक – विद्यासागर कला महाविद्यालय खैरी बिजेवाडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य covid-19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार महाविद्यालयात दिनांक 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या लसीकरण शिबिराचे उद्घाटन विद्यासागर शिक्षण संस्थेच्या सचिव श्रीमती अनिताजी जयस्वाल यांचे हस्ते संपन्न झाले. लसीकरण शिबिराला अध्यक्ष म्हणून विद्यासागर कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पि.के. यु. पिल्लई उपस्थित होते. या शिबिराच्या आयोजनासाठी मनसर पी. एस. सी. चे विशेष सहकार्य लाभले. मनसर पी.एस.सी. च्या डॉ.नेहा साकोरे, पर्यवेक्षक श्रीमती वसू , रूपाली चतरकर, पी. टी. अंबादे यांच्या सहकार्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मनसर पी.एस.सी च्या पर्यवेक्षक श्रीमती वसू यांनी covid-19 च्या संदर्भात लसीचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. पिल्लई यांनी महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने covid-19 संदर्भात असलेल्या लसीचे दोन डोस प्रत्येक विद्यार्थ्यांना घेणे गरजेचे असून जे विद्यार्थी दोन दोन घेणार नाही त्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारले जातील म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी लस घेतली पाहिजे असे आवाहन केले. या शिबिरात महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी लसीचा पहिला डोस तसेच काही विद्यार्थ्यांनी दुसरा डोस घेतला. महाविद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अनिल दाणी यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश सपाटे यांनी आभार व्यक्त केले.याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. सुरेश सोमकुवर , डॉ. सावन धर्मपुरीवार, डॉ.ज्योती कवठे, प्रा. रवींद्र पानतावणे, डॉ. आशिष ठाणेकर, कीर्ती जयस्वाल, जितेंद्र बडनाग, संजय डोंगरे, युनूस पठाण, ज्ञानेश्वर हटवार, ललित कनोजे, रफिक कुरेशी, विनोद परतेती व विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …