अन् शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रु फुलले
दिवाळीनिमित्य शेतकऱ्यांना धोतर व दुपट्ट्याचे वाटप
देवलापार– नजीकच्या पवनी येथिल बँक ऑफ इंडिया येथे शाखा वरीष्ट व्यवस्थापक दुर्वास उके यांचे तर्फे बँकेतील खातेदार शेतकऱ्यांना धोतर व दुपट्टे वाटप करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर आनंदाश्रु दिसुन आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ट शेतकरी व पवनीचे माजी सरपंच शंकर सोनवाने होते तर प्रमुख पाहुणे, कैलास निघोट, राज हरणे, रामप्रसाद दिक्षित, मुकेश तिवारी, कुसुम दिक्षित, इंदिरा वाळके उपस्थित होते.
यावेळी पन्नास शेतकरी पुरुष व महिलांचा धोतर दुपट्टा व साडी लुगडे देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक दुर्वास उके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत सर्व प्रकरच्या कर्जसंबंधी माहिती दिली. सदर कार्यक्रम हा बँकेच्या व पवनीच्या इतीहासातील पहिलाच कार्यक्रम असल्याने मिळालेल्या कपड्यामुळे एकंदरीत आनंदाचे वातावरण होते.
कार्यक्रमाचे संचालन सुशिल उईके यांनी तर आभार राजेश कोकोडे यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वितेसाटी शाखा व्यवस्थापक दुर्वास उके यांचे मार्गदर्शनाखाली
प्रभाकर वाघमारे,हर्षल देशभ्रतार, संदीप फुलसंगे,अरुण नान्हे, जुही गजभीये,निलेश पुर्खे,संजय राउत यांनी सहकार्य केले.