Breaking News

*इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर येथे दिवाळी पहाट या भक्ती व भावगीतांचे सफल आयोजन*

*इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर येथे दिवाळी पहाट या भक्ती व भावगीतांचे सफल आयोजन*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर – दिवाळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मराठी हिंदी भक्ती व भावगीतांचा सुमधुर कार्यक्रम म्हणजे दिवाळी पहाट. या कार्यक्रमाचे सादर करते नागपूर शहरातील सुप्रसिद्ध स्वर रंग म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप होते. कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध कलाकार श्री संजय ठोसर व महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कृत सुप्रसिद्ध गायक शंकरजी ठोसर यांनी प्रमुख सूत्रधार सांभाळले.


कार्यक्रमाची सुरुवात आय एम ए सावनेर चे अध्यक्ष डॉ. निलेश कुंभारे व आय ए पी चे नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ.विजय धोटे व शाखेचे पदाधिकारी डॉ. परेश झोपे, डॉ.विलास मानकर डॉ. चंद्रकांत मानकर डॉ. आशिष चांडक डॉ.सोनाली कुंभारे डॉ. मोनाली फोटो यांनी दीप प्रज्वलन करून केले.*

*याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर चे सदस्य तसेच निमा व होमिओपेथीक असोसिएशन सावनेर चे इतर सदस्य उपस्थित होते.*

*कार्यक्रमाप्रसंगी डॉ.चंद्रकांत मानकर, सौ रजनी मानकर, डॉ.नितीन पोटोडे, डॉ. मोनाली पोटोडे, डॉ. उमेश जीवतोडे, डॉ.पूजा जीवतोडे, डॉ.विलास मानक,र डॉ. गौरी मानकर,डॉ.सचिन घटे, डॉक्टर विजय घटे, डॉ.अमित बाहेती, डॉ. अंकिता बाहेती, डॉ.अशिष चांडक, डॉ.रेणुका चांडक, डॉ.प्रशांत घोडसे, डॉ.दुबे, डॉ. संजय दोरखंडे, डॉ. स्वप्नील काळे, डॉ.सुरेंद्र गेडाम, डॉक्टर मर्फी , डॉ.अशोक जैस्वाल व इतर डॉक्टर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयएमएचे सचिव यांनी केले.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …