*कन्हान येथे भारतीय विध्यार्थी दिवस थाटात साजरा*
*वंचित बहुजन आघाडी व्दारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान गहुहिवरा चौक येथे वंचित बहुजन आघाडी शाखा कन्हान व्दारे भारतीय विध्यार्थी दिवस मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला.
रविवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ ला वंचित बहुजन आघाडी व्दारे गहुहिवरा चौक कन्हान येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करून वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर अध्यक्ष नितेश मेश्राम यांनी विशेष मार्गदर्शनात महामानव भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विध्यार्थी जीवनातील संघर्षा वर प्रकाश टाकुन दिनांक.७ नोव्हेंबर दिवस हा त्यावेळी वंचित, पिडित, शोषितांकरिता उदयास आलेल्या प्रकाशमय दिवसामुळं वंचित समाजाला आज शिक्षण, सामाजिक न्याय, बंधुता, समता, मौलिक हक्क, अधिकार, देशाला संविधान पर्यंतचा प्रवास याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रसंगी प्रामुख्याने रामटेक विधानसभा उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संकल्प करण्यात आले की सामाजिक शैक्षणिक न्यायाकरिता वंचित बहुजन आघाडी विध्यार्थी मित्रा सोबत नेहमी खंभीर उभे राहुन कार्य करणार. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार आभार महासचिव कन्हान शहर प्रवक्ता रजनीश (बाळा) वामन मेश्राम यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता कन्हान शहर उपाध्यक्ष शैलेश भाऊ ढोके, विकास साहारे, अमोल साहारे, मंगेश रंगारी, अरूण टेभुर्णिकर, जतीन गजभिये, भोला राणे, सतीश ढबाले सह आदि कार्यकर्त्यानी उपस्थित राहुन सहकार्य केले.
Maharashtra News Media सच की आवाज