*भेसळयुक्त खाद्य तेल जप्त*
नागपुर प्रतिनिधि-
शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी केलेल्या तक्रारीवरून नागपूर शहरातील अन्न व औषधी विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या पथकासह सेंट्रल एवेन्यू रोड वर असणाऱ्या छापरु नगर येथील निकृष्ट भेसळयुक्त अत्यंत घातक अश्या खाद्य तेल निर्मितीच्या गोडाऊन वर छापा टाकून अंदाजी 17 ते वीस लाखांचा मुद्देमाल आज दिनांक दोन अकरा 19 रोजी जप्त केला.
*सणासुदीच्या दिवसात अन्य धान्य,गोडे तेल,मसाले पदार्थ, मिठाई सारख्या खान्यापीण्याच्या वस्तुत मीलावटीचे प्रमाणात वाढ होत असल्याने अश्या मीलावट खोरांवर कारवाई ही अपेक्षित असते असाच प्रकार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या निदर्शनास येताच त्यांनी केलेल्या तक्रारी वरुण सदर कारवाई करण्यात आली सदर कारवाई मुळे भेसळ करणार्यांचे धाबे दनानले आहे