*प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन गैरअर्जदारा वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी*
*शिवसेना महिला पदाधिकार्यांचे कन्हान पोलीस स्टेशन मार्फत महाराष्ट्र मेडीकल काॅन्सिल व संबंधित अधिकार्यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
कन्हान – कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे वैद्यकीय अधिकारी यांचे बेजबाबदार पणामुळे घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन गैरअर्जदारा वर कायदेशीर कारवाई करुन उचित न्याय मिळवुन देण्याची मागणी शिवसेना महिला पदाधिकार्यांनी उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या नेतृत्वात व शहर महिला प्रमुख मनिषा चिखले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कन्हान पोलीस स्टेशन मार्फत महाराष्ट्र मेडीकल काॅन्सिल व संबंधित अधिकार्यांना यांना निवेदन पाठवुन केली आहे .
निवेदनात सांगितले आहे कि शनिवार दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ४:०० वाजता च्या दरम्यान श्रीमती अनुराधा फजित टोहने यांचे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली व शस्त्रक्रिया करतांनी गैर अर्जदार श्री नाईकवार यांच्या हातांनी अनुराधा फजित टोहने यांचा पोटाची नस काटली गेली . परंतु गैर अर्जदार श्री नाईकवार यांनी अनुराधा फजित टोहने व त्यांचा नातेवाईकांना यांची बीपी वाढल्यामुळे यांना मेडिकल रुग्णालय नागपुर ला हलविण्यात यावे व त्या ठिकाणी यांना भरती करावे असे सांगितले गेले असुन अनुराधा फजित टोहने स्ट्रेचरवर २ ते ३ तास पडुन राहिले आणि शरीरातुन खुप रक्त वाहत होते . परंतु प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथील गैर अर्जदार वैद्यकीय अधिकारी श्री नाईकवर व इतर अधिकारी यांचे कडुन कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही व प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे १०८ एॅम्बुलंस उपलब्ध असुन सुद्धा वैद्यकीय अधिकारी यांनी साध्या एॅम्बुलंस मध्ये मेडिकल रुग्णालय नागपुर ला हलविले व गैर अर्जदार श्री नाईकवर यांनी भर्ती करुन मेडिकल रुग्णालय नागपुर येथुन निघुन गेले . तसेच यांचे करण्यात आलेली कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया अयशस्वी झाली असुन यांचे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया पुन्हा कधीच करता येणार नाही असे मेडिकल रुग्णालय नागपुर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे .
तसेच गेल्या काही महिन्या अगोदर अश्याच प्रकारची घटना जवाहरलाल नेहरू चिकित्सालय कांन्द्री येथे सुद्धा प्रशासना च्या बेजबाबदार पणामुळे दिनांक १३ एप्रिल २०२१ ला चार व्यक्तींचा मृत्यु झाला असुन देखील अनेक पत्र-व्यवहार करण्यात आले असुन आज पर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही .
सदर झालेल्या सर्व गैर प्रकारास वैद्यकीय अधिकारी यांच्या बेजबाबदार पणामुळे व प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथील उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी कर्तव्यात अलगर्जी केल्यामुळे त्यांचा जिवाशी खेळण्यात आले असल्याचे आढळुन आल्याने शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या नेतृत्वात व शिवसेना महिला शहर प्रमुख मनिषा चिखले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेना महिला पदाधिकार्यांनी कन्हान पोलीस स्टेशन मार्फत महाराष्ट्र मेडीकल काॅन्सिल व संबंधित अधिकार्यांना निवेदन पाठवुन प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन गैरअर्जदारा वर कायदेशीर कारवाई करुन उचित न्याय मिळवुन देण्याची मागणी केली आहे .
*डॉ योगेश चौधरी यांची प्रतिक्रिया : -*
या घटने बाबत कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले कि अनुराधा फजीत टोहणे ३० वर्षांची महिला प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे दिनांक २४/०९/२०२१ ला प्रवेश करुन कुटुंब कल्याण शत्रक्रिया साठी दिनांक २५/०९/२०२१ ला डॉ नायकवार सर्जन (रामटेक) यांनी आॅपरेशन केले .इंट्राऑपरेटिव्ह डाव्या अंडाशय इजा झाली . विस्तार मठ्ठा रुग्णतेचे उपस्तिथ नातेवाईक ला समजले की रुग्ण साध्या स्थिर आहे वी रुग्ण ला अजुन गुंतागुंत हौ नयत म्हनून नाईकवार व्ही वरिष्ठ अधिकारी सुचने प्रमाने 04:30 PM ला सलाइन लावून प्राथमिक आरोग्य केंन्द्रा च्या मोठ्या रुग्णवाहिका ने प्राथमिक आरोग्य केंन्द्र च्या वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंन्द्रा च्या च्या सिस्टर्स सोबत जीएमसीएच नागपूर ला रेफर केले. सोबत वारिष्ठ अधिकारी शुध्द यांनी केळे व्ही जीएमसी यांनी नागपूरच्या च्या तज्ञ डॉक्टरांना माहिती दिली .
जीएमसी नागपुर ला प्राथमिक आरोग्य केंन्द्र
चे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोठे यांनी स्वाथ वॉर्ड मध्ये अॅडमिट केले .त्या नंतर सुद्धा डॉक्टरांनी पेशंट्स चे जीएमसी च्या डॉक्टर कडून फॉलो अप घेतले आणि पेशंट सध्या स्थीर आहे असे संगत आले . दिनांक २६/०९/२०२१ रात्री ला स्वत डॉ योगेश चौधरी यांनी रुग्ण साठी एक युनिट रक्त चे व्यवस्था करुण दिली. रुग्णाचा सोनोग्राफी अहवाल ANI पेशंट ची सेवत ची सोनोग्राफी नॉर्मल आल्यावर दिनांक ३०/०९/२०२१ ला
रुग्ण ला डिस्चार्ज करून एएनआय पीएचसी च्या रुग्णवाहिका ने त्यांना घरी बोड़ले . शासना कडुन कुटुंब नियोजन किंवा आजारी करीता गुणवत्ता गुणाच्य प्रचाराचा मोबदल्याच्या फॉर्म सर्व पेपर सोबत धो कार्यालय ला पोहोचविन्यात आले आहे .सोबत रुग्ण ला शासना कडुनआर्थिक मदत मिळाली पाहिजे म्हणून आमचे प्रत्यत्न आहे आणि आम्ही धो ऑफिसच्या संपर्क आहोत. अशी प्रतिक्रिया डॉ योगेश चौधरी यांनी दिली आहे .