*रेल्वे ने कटुन हिरालाल खंडाते यांच्या मुत्यु*
*कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग चा गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी शिवारात रामटेक नागपुर डाऊन लाईन रेल्वे पटरी वर टेकाडी येथील हिरालाल खंडाते यांचा रेल्वेने कटुन मुत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन पोलीस स्टेशन येथे मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक.३१ ला दुपारी ३.३० वाजता च्या सुमारास टेकाडी शिवारात रामटेक नागपुर डाऊन लाईन ५ किलो मीटर अंतरावर उत्तरे भागास टेकाडी येथील रहिवासी मृतक हिरालाल गणराम खंडाते वय ५८ वर्ष यांचा रेल्वेने अपघात होऊन रेल्वे पटरीवर कटुन मुत्यु झाला. या घटनेची माहिती कन्हान पोलीस स्टेशन ला रेल्वे कर्मचाऱ्याने माहिती दिल्याने कन्हान पोलीस स्टेशन चे उप निरीक्षक महादेव सुरजुसे , हेड कॉन्स्टेबल अरूण सहारे, मंगेश सोनट्टके यांनी घटनास्थळी पोहचुन मुत्युदेह कामठी उपजिल्हा रूग्णालयात श्वविच्छेदन करिता पाठवुन फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग चा गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .