Breaking News

*धर्मराज विद्यालय कांद्री येथे राष्ट्रीय संपादणुक सर्व्हेक्षण संदर्भात पालक सभा संपन्न*

*धर्मराज विद्यालय कांद्री येथे राष्ट्रीय संपादणुक सर्व्हेक्षण संदर्भात पालक सभा संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील कन्हान शहर अंतर्गत कांद्री येथील धर्मराज प्राथमिक शाळेच्या वर्ग ३ री च्या पालकांची NAS राष्ट्रीय संपादणुक सर्व्हेक्षण संदर्भात पालक सभा ८नोव्हेंबर रोजी संपन्न झाली.


या पालक सभेत शिक्षक श्री खिमेश बढिये यांनी NAS राष्ट्रीय संपादणुक सर्व्हेक्षण संदर्भातील माहिती पालकांना देऊन १२ नोव्हेंबर शुक्रवारी रोजी होणाऱ्या सर्वेक्षण चाचणीला १००% विद्यार्थी उपस्थित ठेवण्याचे आवाहन केले. तर या चाचणीला पालकांनी संपुर्ण सहकार्य करण्याचे आवाहन धर्मराज प्रायमरी शाळे च्या मुख्याध्यापिका सौ आशा हटवार यांनी केले. पालक सभेचे संचालन शिक्षक श्री भिमराव शिंदेमेश्राम यांनी तर आभार श्री राजु भस्मे यांनी व्यकत केले. यावेळी सौ चित्रलेखा धानफोले मैडम, कु. पुजा चरडे मैडम व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …