*सुलभ शौचालया मध्ये लाईटची सुविधा उपलब्ध व नियमित साफ सफाई करण्याची मागणी*
*कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांचे नप कार्यकारी अधिक्षकाला निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक सात मटन मार्केट परिसर कन्हान पोलीस स्टेशन च्या बाजुला नागरिकांन करिता नगरपरिषद प्रशासना द्वारे सुलभ शौचालय बनविण्यात आले असुन या शौचालयात दोन महिन्यापासुन लाईटची सुविधा उपलब्ध करण्यात आली नसल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांनी मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर च्या नेतृत्वात नगरपरिषद कार्यालय अधीक्षक हर्षल जगताप यांना भेटुन चर्चा करून व एक निवेदन देऊन तात्काळ सुलभ शौचालयात लाईटची सुविधा उपलब्ध व नियमित साफ सफाई करण्याची मागणी केली आहे.
कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासन द्वारे मटन मार्केट परिसर गांधी चौक कन्हान पोलीस स्टेशन च्या बाजुला नागरिकांन करिता सुलभ शौचालय बनवुन १५ ऑगस्ट २०२१ ला लोकार्पण करण्यात आले आहे. परंतु दोन महिन्याचा कालावधी लोटुन सुद्धा नगर परिषद प्रशासना द्वारे या सुलभ शौचालयात लाईटची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. या कन्हान पोलीस स्टेशन च्या बाजुला व संपुर्ण परिसरात दररोज कधी न कधी रात्री व भरदिवसा साप आणि सरपटणारे अनेक प्राणी, जिव जंतु निघत असतात. मागील दहा दिवसा पुर्वी कन्हान पोलीस स्टेशन येथे साप निघाला होता. तसेच शुक्रवार दिनांक.५ नोव्हेंबर ला भरदिवसा सुलभ शौचालयात मोठा धामन साप निघाल्याने परिसरातील व शौचालयात जाणाऱ्या नागरिकान मध्ये भिती चे वातावरण निर्माण झाले असुन रात्रीच्या वेळी सुलभ शौचालयात अंधार असल्याने कसे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुलभ शौचालयात नियमित साफ सफाई होत नसल्याने हळुहळु अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण होत असल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात नगर परिषद कार्यालय अधिक्षक हर्षल जगताप यांना भेटुन चर्चा करून व एक निवेदन देऊन तात्काळ गांधी चौक येथील नगरपरिषद प्रशासना द्वारे बनविण्यात आलेल्या सुलभ शौचालयात लाईटची सुविधा उपलब्ध करण्याची व नियमित साफ सफाई करण्याची मागणी केली आहे. या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, हरीओम प्रकाश नारायण, सुरज वरखडे, कामेश्वर शर्मा, महेंद्र साबरे, हर्ष पाटील, किरण ठाकुर, शाहरुख खान, महादेव लिल्हारे सह आदि मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.