जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत शिष्यवृत्ती योजना मिळण्यापासून राहणार वंचित
उपविभागीय अधिकारी सावनेर यांचे दुर्लक्ष
कळमेश्वर प्रतिनिधि -श्मुशीर सय्यद
शैक्षणिक कामाकरिता खुल्या प्रवर्गाव्यतिरिक्त इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागत असते मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांकडे हे प्रमाणपत्र नसल्यामुळे ते काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू आहे. तसेच पुढील शिक्षण घेण्यासाठी शासनाकडून मिळणारी शिष्यवृत्ती योजना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र दोन महिन्यांपासून मिळत नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
जातीचा दाखला,नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी तालुका स्थरावर सेतू कार्यालयांची स्थापना झालेली आहे. सेतू कार्यालय हे मा.तहसिलदार यांच्या आखत्यारीत येतात.तहसीलदार कार्यालयात आपण जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव सादर करून तो प्रस्ताव उपविभागीय अधिकारी,सावनेर यांच्याकडे पाठविण्यात येते परंतू गेल्या दोन महिन्यांपासून दीड हजार विध्याथ्यांचे प्रकरण उपविभागीय अधिकारी कार्यालय, सावनेर येथे धूळखात असून विध्याथ्यांना शासनाच्या विविध शैक्षणिक योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तसेच ज्या विध्याथ्यांना 17 नंबर चा अर्ज सादर करून शाळेत न जाता परीक्षा द्यायची आहे अश्या विध्याथ्यांची अर्ज सादर करायची अंतिम तारिक संपली आहे परंतू त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने ते परीक्षा देण्यापासून वंचित राहू शकतात.दोन महिन्यांपासून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर मिळत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी कळमेश्वर येथील तहसील कार्यालयात जाऊन आपले उंबरठे झिजवत आहे त्यामुळे विध्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून सुद्धा उपविभागीय अधिकारी , सावनेर यांना गांभीर्य नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
.
*एस.टी.(ST) एस.सी (SC) अथवा एसबीसी व ओबीसी करिता आवश्यक असलेले कागदपत्रे तलाठी रहिवासी दाखला,शाळा सोडल्याचा दाखला, जर अर्जदार अशिक्षित असेल तर मुलाचे मुलीचे शाळेचा दाखला.प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा.वडील, चुलते, आत्या, आजोबा यांची जात नमूद असलेला शाळा सोडल्याचा दाखला,रेशनकार्ड झेरॉक्स व इतर कागदपत्रांची आवश्यकता असते परंतू उपविभागीय अधिकारी यांनी जातीचा दाखला मिळण्यासाठी शाळा सोडल्याची(टी. सी) ची सत्यप्रत याची सक्ती केल्याने ती गहाळ झाल्यास जिम्मेदार कोण असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
आ. सुनिल केदार घेणार दखल
विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता व जात प्रमाणपत्र,नॉन क्रिमीलेअर मिळण्यास होणारा विलंब याची दखल घेत दिनांक 4 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती कळमेश्वर येथे विद्यार्थी व पालकांना त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरता त्यांना बोलावन्यात आले असल्याची माहिती माजी विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी दिली आहे.