Breaking News

*मुलगी झाली म्हणून पत्नीला अमानुष मारहाण* *आई व निरागस मुलीला दुचाकीवरुण पाडून चिरडण्याचा प्रयत्न*

*मुलगी झाली म्हणून पत्नीला अमानुष मारहाण*

*आई व निरागस मुलीला दुचाकीवरुण पाडून चिरडण्याचा प्रयत्न*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः सावनेर पो.स्टे.हद्दीतील फीर्यादी अर्चना देवानंद गौरखडे पहलेपार येथील निवासी हीने सावनेर पोलीसांना आपले पती देवानंद गौरखेडे तसेच सासु व ननद यांच्याविरोधात जबर मारहाण केल्याची तक्रार नोंदवली असुन सावनेर पो.स्टे.चे ठाणेदार मारुती यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊण अपराध क्र.713 भादवी कलम 324 नुसार गुन्ह्याची नोंद करुण पुढील तपास सुरु केला आहे*
*प्राप्त माहितीनुसार फीर्यादी महिला अर्चना व आरोपी हे पती पत्नी असुन काही दिवसाआधी फीर्यादी अर्चनाने एक गोडस मुलीला जन्म दीला तेव्हापासून पती देवानंद तसेच सासू व ननद तीचा मानसिक छळ करुण तीला सलोख्याची वागणूक न देता तीला “तुने मुलगी का जनली”म्हणून मारहाण करु लागले ही बाब सातत्याने सुरु असतानाच दि.7 नोव्हेंबर रोजी फीर्यादी अर्चनाला घरात तीघेही आरोपींनी जबर मारहाण केली व तीला माहेरी सोडून देण्याच्या नावाने आरोपींने आपल्या दुचाकी वाहनावर बसून बेधुंद अडवेतेडवे वाहन चालवत तीला चालत्या वाहनावरूण पाडून चिरडण्याचा प्रयत्न केला असता फीर्यादीने सावनेर पोलीसात वरील तीनही आरोपींच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे*

*एकीकडे जग 21 व्या शतकात वाटचाल करत असुन आजची महिला पुरूषांच्या कांद्याला कांधा भीडवून देशाच्या प्रगतीत आपले योगदान देत आहे.तर दुसरीकडे वंशाचा दिवा,कुळाचे नाव आदींच्या आड मुलगी झाली म्हणून जीवघेण्या प्रकारास मुर्तरुप देण्यासारखे कुकारस्थान रचल्या जात आहे.अश्या क्रुरकर्मा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून असे कु्त्य करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही असे जनसामान्याचे मत आहे.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …