Breaking News

*खापरखेडा येथे उत्सहात साजरा करण्यात आली छठ पूजा* *मंत्री सुनील केदार यांची छठ पूजेला भेटी दरम्यान दिल्या शुभेच्छा*

*खापरखेडा येथे उत्सहात साजरा करण्यात आली छठ पूजा*


*मंत्री सुनील केदार यांची छठ पूजेला भेटी दरम्यान दिल्या शुभेच्छा*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
खापरखेडा :- छठपूजा बिहार मधील एक पारंपारिक सण असून तो वर्षातुन दोनदा साजरा केला जातो. उन्हाळ्यात चैतीछठ तर दिवाळीनंतर कार्तिक छट साजरा केला जातो. दिवाळी नंतर येणारा कार्तिकी छठ बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या सणासाठी महिला 24 तास उपवास ठेवतात. त्यादिवशी सर्वसाधारणपणे नदीत किंवा जलाशयावर पवित्र स्नान करतात आणि सूर्याची पूजा करतात दोन वेळा ही पूजा केली जाते एकदा ही पूजा सायंकाळी आणि नंतर पहाटे केली जाते. तसेच कोराडी – खापरखेडातही कोलार, पोटा, सिल्लेवाडा, वलनी, चन्कापुर नदी घाटावर येथे ही पूजा करण्यात आली.

यावेळी महिलांमध्ये उत्सहाचे वातावरण होते. प्रत्येक छठ पूजेच्या ठिकाणी मंत्री सुनील केदार यांनी भेटी देऊन बिहारी भगिनी बांधवांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पोटा ग्रामपंचायत सरपंच पवन धुर्वे, पोटा ग्रामपंचायत उपसरपंच रिंकू सिंग जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे, पंचायत समिती सदस्य राहूल तिवारी, ग्राम पंचायत सदस्य अनिल छानिकर आदी उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …