*निमखेडा गावात मोकाट श्वानांशी घडलेल्या पशुक्रूरतेच्या घटनेत FIR दाखल*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
नागपुर:- रस्त्यावरील मोकाट श्वानांना स्वातंत्रेचे संवैधानिक अधिकार, कायद्याने संरक्षण आहे तरीदेखील शासन प्रशासनाच्या उदासीनतेमुळे व पशुहितार्थ जनजागृती अभियान राबविले जात नसल्यामुळे मोकाट श्वानांवर अत्याचाराच्या घटना दररोज निर्दशनास येत आहे ही गांभीर्याची बाब असून मोकाट प्राण्यांच्या अधिकारांचे हनन होय.
मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अत्यंत वायरल होत आहे ह्या विडिओ मध्ये मोकाट श्वानांचे तोंड व पाय रस्सीच्या साहाय्याने क्रूरतेने बांधल्याचे दिसत आहे. ह्या विडिओची दखल जागतिक स्तरावर घेतल्या गेली त्यामुळे समस्त पशुप्रेमी या पशुक्रूरतेच्या घटनेची निंदा करत आहे तसेच असे अमानवीय कृत्य करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाहीची मागणी समाजमाध्यमावर होत आहे.
*ह्या पशुक्रूरतेच्या घटनेच्या विडिओबद्दल स्वप्नील बोधाने, R.A.D बहुउद्देशीय संस्था, आशिष कोहळे (people for animals unit -2), ममता वासे, सुजाता उंदिरवाडे, सचिन यांना माहिती मिळताच स्व-स्तरावर ह्या विडिओ ची सत्यता पडताळली असता कळले की 25-10-2021 ला मौदा तालुका येथील निमखेडा गावात डुक्कर पकडणारी टोळी व गावातील 2 लोकांनी एका व्यक्तीच्या आदेशावरून गावातील मोकाट कुत्रे डुक्कर पकडण्याच्या जाळ्याच्या साहाय्याने निर्दयतेने पकडून त्यांचे तोंड पाय बांधले, श्वानांना मारहाण केली त्यात एका श्वानाचा जागीच मृत्यू झाला व इतर 6-8 कुत्र्यांना वाहत्या नहर मध्ये फेकले ही माहिती मिळाली होती.*
ह्या महितीच्या आधारावर कायद्यांव्ये आरोपी विरुद्ध कठोर कार्यवाही व्हावी म्हणून स्वप्नील बोधाने, R.A.D बहुउद्देशीय संस्था, आशिष कोहळे (PFA unit 2 ), यांनी अरोली पोलीस स्टेशन मध्ये पोहचून लेखी तक्रार देऊन पी.आय कोळी साहेब यांच्या निर्दशनास हा विषय आणून दिला त्या आधारावर स्वप्नील बोधाने यांच्या तक्रारीच्या आधारे आरोपीं विरुद्ध पशुक्रूरता निवारण अधिनियम व भारतीय दंड संहितानुसार FIR दाखल केल्या गेली.
स्थानिक क्षेत्रातील राजनैतिक लोकांनी ह्या पशुक्रूरतेच्या प्रकरणाला दाबण्याच्या बराच मोठा प्रयत्न केला होता. वस्तीतील मोकाट स्वस्थ श्वानांना नियमांचे उल्लंनघन करून कोणाच्या आदेशानुसार पकडण्यात आले तसेच पाय तोंड बांधलेल्या श्वानांचे काय झाले, त्यांचे मृत शरीर मिळेल का ? हा पुढील तपासाच्या आधारे अन्य कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. ह्या प्रकरणात adv. बसवराज हौसगोडर, अंजली वैद्यार् यांचे विशेष सहकार्य लाभले.
ह्या पशुक्रूरतेच्या प्रकरणाविषयी व नागपूर मध्ये घडलेल्या इतर घटनाविषयी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, पशुसंवर्धन मंत्री, पशुसंवर्धन आयुक्त, प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती, जीव जंतू कल्याण बोर्ड भारत यांना तक्रार देण्यात येणार आहे जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नये व पशुहितार्थ उचित उपाययोजना करण्यात याव्या.
*रस्त्यांवरील मोकाट स्वस्थ श्वानांना नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपरिषदद्वारे पकडून दुसरीकडे स्थलांतरीत करणे, श्वानांना मारहाण करणे, विष देणे, हत्या करणे, जख्मी करणे कायद्याने गुन्हा आहे तसेच मोकाट श्वानांना अन्न देणाऱ्या पशुप्रेमीवर अत्याचाराच्या घटना घडल्यास लगेच पोलीस स्टेशन ला लेखी तक्रार द्यावी अथवा पोलीस नियंत्रण कक्ष यांना माहिती द्यावी तसेच पशुक्रूरतेचे वाढते प्रकरण बघता सरकारने पशुक्रूरता नियंत्रण कक्ष प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत उभारावे व शहरी-ग्रामीण क्षेत्रात युद्धस्तरावर ABC रुल 2001चे पालन करून नसबंदी अभियान राबवावे.*
– पशूप्रेमी स्वप्नील बोधाने नागपूर महाराष्ट्र