*फुलबांधे कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी नाभिक समाज एक जुट*
*तहसीलदार, पोलीस ठाणेदार, नगर पंचायत प्रशासन यांना सकल नाभिक समाजाने दिले निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
पारशिवणी : जिल्ह्यातील बहू चर्चित आशा फुलबंडे मृत्यू प्रकरणी पारशिवणी शहरात जिल्ह्यातील नाभिक समाजाने एकत्र येऊन आशा फुलबांधे यांना न्याय मिळावा या करिता शांतीमार्च काढत नाभिक नेता शरद वाटकर यांचा नेर्तृत्वात संस्थापक अध्यक्ष धनराज वलोकार यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये पारशिवनी तालुक्याचे तहसीलदार प्रशांत सांगोडे , पारशिवनी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हद्यनारायण यादव व नगर पंचायत यांना शेकडो नाभिक सामाजाच्या लोकांनी निवेदन सादर केले व तहसील कार्यालयाचा परिसरात असलेल्या अर्जिवन्स या कामासाठी उभारलेल्या शेड त्याचा ताब्यात घेण्यात यावा अशी मागणी नाभिक एकता मंच च्या पदाधिकारी यांनी केली . पारशिवनी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हद्यनारायण यादव यांना भेटतांना फरार आरोपी अशोक डायरे याला लवकरात लवकर पकडून शिक्षा व्हावी या साठी सकल नाभिक ने घेराव करत मागणी केली . या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष राहुल कान्होलकर, नरेश संजय फुलबांधे,लक्षणे,तालुका अध्यक्ष सुनील लक्षणे,शेषराज येउतकर, देविदास बोरकर,अभिषेक एकूनकार,गणेश खैरकर, मनोज धानोरकर, दिलीप लक्षणे,प्रशांत चोधरी, घुमे काकाजी,दिनेश उप्पलवर, दिवाकर उनपणे, विनोद पारधी, शिवा कान्होलकर, रोशन बोरकर,संतोष दहिफडकर,या अभिजित फुलबांधे, कचरू अंजनकार,छत्रपती येस्कर,सुरेश बोपुलकर,प्रशांत लक्षणे, लीलाधर कावळे जगदीश फुलबांधे, सह आदी नाभिक समाज लोक प्रमामुख्याने उपस्थित होते.
*कारवाई न केल्यास आंदोलन करू – शरद वाटकर*
एक आरोपी अजून ही पोलिसांच्या ताब्यात आला नाही पोलीस अटक करण्यात का आली नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे स्थानीय प्रासाशनाने कार्यवाहीसाठी कोणती ही दिरंगाई केली तर नाभिक समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार अशी प्रतिक्रिया शरद वाटकर माजी जिल्हा अध्यक्ष यांनी दिली आहे .