**फी न भरल्यामुळे 150 च्या वर विद्यार्थ्यांना पोहचवले घरी*

**फी न भरल्यामुळे 150 च्या वर विद्यार्थ्यांना पोहचवले घरी*


*सारस्वत सेंन्ट्रल पब्लिक स्कुल चा प्रताप*


*संतप्त पालकांनी शाळेवर पोहचून घातला गोंधळ*

मुख्य संपादक -किशोर ढूँढेले ,सावनेर

*सावनेर *सावनेर शहरा पासुन तीन कीमी अंतरावर असलेल्या सारस्वत सेंन्ट्रल पब्लिक स्कूल येथील जवळपास 150 च्या वर विद्यार्थ्यांना शाळेत बसु न देता परतीच्या पावलाने घरी परत पाठवल्याने एकच खळबळ उडाली व मुलांना घरी परत पाठवन्याचे कारण काय हे जाणून घेण्याकरिता पालक वर्गाची शाळा परिसरात गर्दी होऊ लागली*
*घडलेल्या प्रकाराची सत्यता जाणून घेण्याकरिता आमचे स्थानिक प्रतिनिधी यांनी शाळा परिसरात पोहचून सत्यता जाणून घेण्याचे प्रयत्न केले असता पालक वर्गानी संतप्त प्रतिक्रिया देत आपण फी का भरली नाही यावर भाष्य न करता शाळा व्यवस्थापनास धारेवर धरत आपला रोष व्यक्त केला*


*तर शाळेच्या प्राचार्य शिमला सिंग यांनी घडलेला प्रकार हा खरचं दुखःद आहे त्याकरिता त्यांनी दिलगीरी सुध्दा व्यक्त केली परंतू पालक वर्ग वारंवार सुचना व टेक्स मँसेज करुण सुध्दा मागील एप्रील महिन्या पासून ची फी म्हणजे शैक्षणिक सत्र एप्रिल महिन्यापासुन सुरु झाले असून मागील आठ (8)महिन्यापासुन फीस आलेली नाही. अशा अवस्थत फी येत नसेल व वारंवर दिलेल्या सुचना व शाळा व्यवस्थापना कडून उपलब्ध असलेल्या मुभेचा गैर फायदा उचलत असेल तर शाळा व्यवस्थापनास कुठेतरी टोकाचे पाऊल ऊचलण्यास बाध्य व्हावे लागते व त्यातुनच हा प्रकार घडल्याचे सांगत म्हटले की शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पगार द्यावा लागतो सणासुदीचे व दिवाळी सारखा सणा आधी सर्व कर्मचाऱ्यांना पगार देण्या करिता शाळा व्यवस्थापनास इतरत्र हुन व्यवस्था करावी लागली ही परिस्थिती कुणीही जाणून न घेता व पालक वर्ग आपल्या पाल्यांना वर्गात बसु न देता घरी का पोहचविल्याचा रोष व्यक्त करण्या आधी असे का घडले ,याला जवाबदार कोण यावर विचार न करता बिनबुडाचे आरोप प्रत्यारोप करणे कितपत योग्य आहे.शाळा व्यवस्थापन नेहमीच पालक वर्गांच्या आर्थिक समस्या जाणून त्यांना योग्य पेक्षाही जास्त मुभा उपलब्ध करुण देते परंतू स्थिती नियंत्रणा बाहेर जात असल्यावर मात्र असे कठोर पाऊल उचलण्यास बाध्य व्हावे लागते.आजच्या प्रकारा पुर्वी ही सोमवार ला सर्व पालकांना या विषयाच्या सुचना देऊण जाणीव करुण देण्यात आल्या होत्या व आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या घरा पर्यंत पोहचवीले न की बाहेर काढले असे मत व्यक्त करत म्हटले की आजचे जे विध्यार्थांचे शैक्षणिक नुकसान झाले ते अतिरिक्त तासिका घेऊण ते पुर्ण करुण देऊ कारण ते आमचे विद्यार्थी आहेत असे मत व्यक्त केले*

आज रोजी घडलेला प्रकार हा नक्कीच चुकीचा होता परंतु पालक वर्गाच्या दिरंगाई मुळे हा प्रसंग जरी ओढावला असला तरी असे व्हायला नव्होते त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मानावर विपरीत परिणार होऊ शकतो असे उपस्थित पालक व जाणकारांचे मत आहे*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …