Breaking News

*मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली*

*मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली*

 

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर : अज्ञात कारणावरून एका तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना स्थानिक काकडे ले-आऊटमध्ये सायंकाळी पाच च्या सुमारास उघडकीस आली.


मिळलेल्या माहितीनुसार, मयुरी लक्ष्मण लांजेवार (25) ही प्रभाग क्रमांक 8 काकडे लेआउट येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी मयुरीची आई शेजारी बसायला गली होती आणि मयुरी घरात एकटीच होती. संध्याकाळी ५ च्या सुमारास तिची आई घरी परतली तेव्हा तीला मयुरी छताला फासाच्या साह्याने लटकलेली दिसली.*

*घटनेची माहिती सावनेर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून त्याचा मृतदेह खाली उतरून घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे पोहोचवला.*

*मयुरीचे वडील वेकोलि सावनेर येथे कार्यरत असून मोठा भाऊ नागपुरात अभियंता असल्याची माहिती आहे. मयुरीचे लग्न नुकतेच ठरले होते, जे काही कारणाने तुटले, त्यामुळेच तिने हे आत्महत्ये सारखे आत्मघाती पाऊल उचलल्याचे बोलल्या जात आहे.*


*याप्रकरणी सावनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरिक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शिवाजी नागवे करीत आहेत.*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …