Breaking News

*ढवलापुर ग्रामपंचायत येथे जननायक बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती सरपंचा सौः प्रिती मड़ावी चा हस्ते थाटात साजरी*

*ढवलापुर ग्रामपंचायत येथे जननायक बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती सरपंचा सौः प्रिती मड़ावी चा हस्ते थाटात साजरी*

प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

पाराशिवनी :- जननायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती जय सेवा आदीवासी मंडळ ढवलापुर व जयसेवा गोंडवाना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 15 नोव्हेंबर ला ढवलापुर ग्राम पंचायत , तालुका पारशिवनी च्या प्रांगणात मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली. यावेळी झंडावंदन चा कार्यक्रम ढवलापुर ची सरपंचा प्रितीताई मडावी च्या अध्यक्षतेखाली व रामचरण करनाके मानी , पंचायत सामिती सदस्य यांचे प्रमुख उपास्थितीत क्रांतिवीर बिरसा मुंडा, यांच्या प्रतिमेचे पूजन करून नागरिकांना मार्गदर्शन करतांना बिरसा मुंडा यांनी जल, जंगल जमिनीच्या रक्षणासाठी ब्रिटिशाविरुद्ध संघर्ष केला. आदिवासी बांधवांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजाच्या उत्थानासाठी कार्य करावे असे सांगितले, आदिवासी समाजाची संस्कृती ही प्रगल्भ असून समाजाने संघटित होऊन शिक्षणाद्वारे मोठे ध्येय गाठावे असे सरपंचा सौः प्रिती मडावी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.


ढवलापुर ग्राम पंचायत च्या परिसरात येथील पंचायत सामिती चे माजी सदस्य रामचरण करनाके यांनी सुद्धा समाजबांधवानी संघटित होण्याची गरज आहे असे सांगून क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदर्श घेऊन पुढे वाटचाल करायची आहे असे आपल्या मार्गदर्शन वर भाषणात सांगितले. श्री बाळकृष्ण खंडाते यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले .तर श्री मनीराम उईके यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.
या प्रसंगी सरपंच प्रिती मडावी, रामचरण करनाके, बाळकृष्ण खंडाते, शिवलाल नैताम ,सुभाष कोडवते, सिताराम अडमाची, गोपी नैताम, तुलसीराम सारियाम, मनिराम उईके, सुर्यभान कोड्वते , मनोहर उईके, सुखचरण करनाके व सर्व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …