Breaking News

*रेल्वे ने पडुन एका इसमाचा मृत्यु* *सालवा / चाचेर स्टेशन जवळ ची घटना* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग चा गुन्हा दाखल*

*रेल्वे ने पडुन एका इसमाचा मृत्यु*

*सालवा / चाचेर स्टेशन जवळ ची घटना*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग चा गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सालवा / चाचेर च्या मध्ये रेल्वे ने पडुन एका इसमाचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन पोलीस स्टेशन येथे मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .


पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर ला दुपारी १:३० वाजता च्या दरम्यान मृतक संजुकुमार सिंधु स्वाहीन वय ३३ वर्ष राहणार नलीहाडा हा सुरत वरुन उडीसा येथे रेल्वेनी जात असतांना कन्हान परिसरातील सालवा चाचेर रेल्वे स्टेशन दरम्यान पोल नंबर ११०३/१६ ११०३/१८ जवळ एक इसम रेल्वेतुन खाली पडला असुन त्याचा हातापायाला गिट्टीचा मार लागुन गंभीर जख्मी झाल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यु झाला .
या घटनेची माहिती रेल्वे चौकीदार यांनी कन्हान पोलीस स्टेशन ला दिली असता कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार नरेश वरखडे व शिपाई मंगेश सोनटक्के यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतकाला शवविच्छेदना करिता कामठी रुग्णालयात पाठविले . सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी मोहनलाल प्रसादी लाल वय ८६ वर्ष राहणार आरपीएफ आऊट पोस्ट कामठी एसीआई यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग क्रमांक ४४/२०२१ कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नरेश वरखडे हे करीत आहे .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …