Breaking News

*कन्हान येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व रानी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी* *भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व रानी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी*

*भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यालयात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १०४ वी जयंती साजरी करण्यात आली असुन कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी चौक येथे झासी ची रानी लक्ष्मीबाई यांची १९३ वी जयंती साजरी करण्यात आली .

भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय

कन्हान येथील भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ट महाविद्यालय व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय कन्हान यांचे संयुक्त विद्यमाने स्व.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १०४ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन प्राचार्य एस आर बनकर यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली .

शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर ला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ट महाविद्यालय व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय कन्हान यांचे संयुक्त विद्यमाने
महाविद्यालया च्या कार्यालयात घेण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित प्राचार्य एस आर बनकर यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता भारताची पंतप्रधान पहिल्या महिला प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांनी देशाची धुरा सांभाळली व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्याने त्यांना भारतरत्न ,आयरण लेडी म्हणून उपाधी देण्यात आली असे प्राचार्य एस आर बनकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले . कार्याक्रमाचे सुत्र संचालन प्राध्यापक सायरे सर यांनी केले केले .या प्रसंगी श्री रतन रेखाते सर,श्री मनोज चिकटे सर सह इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कन्हान शहर विकास मंच द्वारे रानी लक्ष्मीबाई यांची १९३वी जयंती साजरी

कन्हान शहर विकास मंच द्वारे झांसी ची रानी लक्ष्मीबाई यांच्या १९३ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच पदाधिकारी महेश शेंडे यांच्या हस्ते रानी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत रानी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी करण्यात आली .
शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर ला झांसी ची रानी लक्ष्मीबाई यांच्या १९३ व्या जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच पदाधिकारी महेश शेंडे यांच्या हस्ते रानी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच सलाहकार महादेव लिल्हारे , मार्गदर्शक भरत सावळे यांनी रानी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी रानी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत रानी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , भरत सावळे , महादेव लिल्हारे , महेंद्र साबरे , हरीओम प्रकाश नारायण , हर्ष पाटील , महेश शेंडे , सुरज वरखडे , प्रकाश कुर्वे , शाहरुख खान , कामेश्वर शर्मा , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …