Breaking News

*कन्हान येथे हुतात्मा स्मृती दिवसी शहिदांना श्रद्धांजली* *कन्हान शहर विकास मंच व्दारे शहिदांना श्रद्धांजली अर्पण*

*कन्हान येथे हुतात्मा स्मृती दिवसी शहिदांना श्रद्धांजली*

*कन्हान शहर विकास मंच व्दारे शहिदांना श्रद्धांजली अर्पण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान येथे हुतात्मा स्मृती दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच व्दारे तारसा रोड शहिद स्मारक चौकात पुष्प अर्पण करून गांधी चौक कन्हान येथे कार्यक्रमासह शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रविवार दिनांक.२१ नोव्हेंबर ला हुतात्मा स्मृती दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे शहिद चौक येथे मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या प्रमुख उप स्थितीत तारसा रोड शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करून दोन मिनटाचे मौनधारण करून संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या १०७ वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर गांधी चौक कन्हान येथे मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांनी शहिद स्मारकावर पुष्पहार माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकाऱ्यांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी मध्ये शहिद झालेल्या १०७ हुतात्म्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे, हर्ष पाटील , कामेश्वर शर्मा, हरिओम प्रकाश नारायण, महेश शेंडे, शाहरुख खान, अक्षय फुले, शुभम मंदुरकर, महेंद्र साबरे, महादेव लिल्हारे, प्रकाश कुर्वे, किरण ठाकुर सह आदि मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …