Breaking News

*वेकोलि खुली कोळसा खदान चा १० टन कोळसा चोरून नेतांना ट्रक पकडला* *दोन आरोपी फरार , ट्रक कन्हान पोलीसांच्या ताब्यात* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल , आरोपीचा शोध सुरु*

*वेकोलि खुली कोळसा खदान चा १० टन कोळसा चोरून नेतांना ट्रक पकडला*

*दोन आरोपी फरार , ट्रक कन्हान पोलीसांच्या ताब्यात*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल , आरोपीचा शोध सुरु*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत ६ किलो मीटर अंतरावर पश्चिम भागास असलेल्या कामठी कोळसा खुली खदान डेपो मधुन दोन आरोपीने १० टन कोळसा चोरून ट्रक मध्ये भरतांना वेकोलि सुरक्षा कर्मचारी यांनी पेट्रोलिंग दरम्यान पकडुन कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार केल्याने कन्हान पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक.२३ नोव्हेंबर २०२१ ला सायंकाळी ४ ते १२ वाजता दरम्यान आरोपी १) शैलेश कडबे २) ट्रक चालक राहणार खदान कन्हान यांनी वेकोलि कामठी खुली कोळसा खदान च्या कोळसा डेपो मधुन १० टन कोळसा किंमत अंदाजे ५०,००० रूपयाचा मुद्देमाल चोरून वेकोलि परिसरात एका ठिकाणी जमा करून ट्रक मध्ये भरतांनी वेकोलि सुरक्षा कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंग दरम्यान दिसल्याने दोन्ही आरोपी ट्रक व ट्रक चा माल सोडुन पळुन गेल्याने वेकोलि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कोळसा व ट्रक ताब्यात घेत कन्हान पोलीस स्टेशन ला स्वाधिन केले . सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी वेकोली सुरक्षा कर्मी संतोष ईंद्रासन यादव वय ३७ वर्ष राहणार. कामठी काॅलरी कन्हान यांच्या तोंडी रिपोर्ट वरून दोन्ही आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक. ४२८/२०२१ कलम ३७९ , ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख हे पुढील तपास करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …