Breaking News

*ऑनलाइन लाँटरी बक्षीसाच्या लोभात अडकू नका* *केबीसीच्या नावावर 25,50 लाखांच्या बक्षिसाचा फुस लावला जात आहे*

*ऑनलाइन लाँटरी बक्षीसाच्या लोभात अडकू नका*

*केबीसीच्या नावावर 25,50 लाखांच्या बक्षिसाचा फुस लावला जात आहे*

सावनेर: अमिताभ बच्चन संचालित कौन बनेगा महा करोडपती या शोमध्ये लकी ड्रॉमध्ये तुमचा नंबर मिळाल्याबद्दल आणि 25 ते 50 लाख रुपयांची बक्षिसे जिंकल्याबद्दल अभिनंदन करून फसवले जात असल्याचा मेसेज अनेकांना यांना त्यांच्या व्हॉट्सअँपवर येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर एका अनोळखी नंबरवरून कॉल येतो आणि स्वताचे नाव अजय, विजय, समीर वगैरे सांगून बक्षिसासंबंधित सर्व दिशाभूल करणारी माहिती देऊन तुमची हाव जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो. लॉटरीवर अंकीत क्रमांकावर व्हॉट्सअँप कॉल करण्यास म्हणतात.*

*आम्ही कॉल केला तर ते सुद्धा आम्हाला त्याच गोष्टी मोठ्या उत्साहाने सांगतात. तसेच तुम्हाला त्यांच्या आँनलाईन खात्यात ती रक्कम पाठवण्यासाठी तग धरतात सोबतच ते तुमच्याकडे तुमचे आधार आणि पॅन कार्ड आणि बँक खाते मागतात.त्याच्या फसव्यागीरीला आपण बळी पडून जर त्यांची हजार बाराशेची मागणी पुरःण करताच ते आपल्या खात्यातील सर्व पैसे काढून घेतात*

*अशीच एक घटना नुकतीच समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार किशोर धुंडेले यांच्यासोबत घडली, ज्यात त्यांना या अनोळखी व्हॉट्सअँप 923457257991 वरून व्हिडिओ मेसेज आला आणि या व्हॉट्सअँपवर 8640023597 या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले.*

*वरील क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनीही तोच सूर लावला असता त्यांनी सांगितले की, सध्या माझ्याकडे सध्या ना रोख रक्कम आहे ना बँकेत आहे, जर तुम्हाला बक्षीसाच्या रकमेतून हवे असेल तर तुम्ही पाच दहा हजार रुपये कमी करुण मला उर्वरित रक्कम द्या, पण तसे होत नाही म्हणत म्हणत कुणाकडून हात उसनेकरुण तुम्हाला दिलेल्या खात्यात ऑनलाइन जमा करण्याचा आग्रह धरू लागला. त्यावर आमच्या स्थानिक वार्ताहराने त्यांना असे फसवे काम करू नका, असे सांगितल्यावर त्यांनी शिवीगाळ करून फोन बंद केला.*

*आम्ही आमच्या सर्व वाचक प्रेमींना विनंती करतो की, या खोट्या लकी बक्षीस सोडतीमुळे फसून किंवा दिशाभूल होऊन, तुमचे आधार, पॅनकार्ड आणि बँक खात्याची माहिती कोणत्याही अज्ञान व्यक्तीकडून देऊ नका, अन्यथा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते…*

*सावध रहा सावध रहा…*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …