*महामार्गा लगत पडुन राहिलेल्या इसमाचे चाळीस हजार रू. सह महत्वाचे कागद पत्र अज्ञात आरोपी ने लंपास केले.*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत ०७ किलो मीटर अंतरावर असलेल्या अण्णामोड डुमरी येथे फिर्यादी नरेश महाजन हा मनसर मार्गाने नागपुर ला जात असतांना चक्कर आल्याने खाली पडुन रहिल्याने कोणीतरी अज्ञात आरोपी ने त्यांच्या जवळचे ४०,००० रुपये सह मोबाइल, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसेंन्स काढुन घेवुन जावुन लंपास केल्याच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक.८ नोव्हेंबर ला रात्री ८:३० वाजता ते मंगळवार दिनांक.९ नोव्हेंबर २०२१ ला सकाळी ७ वाजता दरम्यान फिर्यादी नरेश मधुकरराव महाजन वय ६३ वर्ष राहणार. महाल नागपुर यांनी दिघोरी रेल्वे येथील डिस्क्रीट सेंन्ट्रल को ऑपरेटिव्ह बैंकेतुन ४०,००० रुपये काढुन एमएच ४९ एसी २५६६ क्रमांकची अँक्टीव्हा मोपेडनी रामटेक ला गेले असता मित्राची भेट न झाल्याने मित्राच्या घरून शेतात पवनी ला जावुन मनसर मार्गाने नागपुर ला जात असतांना सोमवार ला रात्री ८:३० वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील अण्णामोड डुमरी जवळ रोडवर चक्कर आल्याने पडुन राहिले. त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपी ने फिर्यादी नरेश महाजन जवळ असलेले नगदी ४०,००० रुपये सह मोबाइल, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसेंन्स काढुन घेवुन जावुन लंपास केले. सदर प्रकरणी फिर्यादी नरेश महाजन यांच्या तोंडी तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नरेश वरखडे हे करित असुन आरोपीचा शोध घेत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज