Breaking News

*कन्हान शहरात व परिसरात विविध संघटने द्वारे २६ नोव्हेंबर संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा* *विविध शाळेत व ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान शहरात व परिसरात विविध संघटने द्वारे २६ नोव्हेंबर संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा*

*विविध शाळेत व ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरात व परिसरात २६ नोव्हेंबर संविधान दिवस निमित्य विविध शाळेत व संघटने द्वारे कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक सह इतर विविध ठिकाणी करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन , शासकीय कार्यालयात अधिकार्यांना , संविधानाची प्रत वाटप करुन , संविधानाचे वाचन करुन व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संविधान दिवस मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला .

कन्हान-पिपरी नगरपरिषद येथे संविधान दिवस थाटात साजरा

कन्हान-पिपरी नगरपरिषद कार्यालयात शुक्रवार दिनांक.२६ नोव्हेंबर २०२१ ला संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद कार्यालय येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित सर्व नगरपरिषद अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व कर्मचाऱ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिष दे च्या नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, नगरसेवक राजेश यादव, नप अधिक्षक हर्षल जगताप, अधिकारी फिरोज बिसेन, संकेत तलेवार, प्रिया शिरसाठ, निरंजन बढेल, नेसल बढेल, देविलाल ठाकुर, शुभम येलमुले, रविंन्द्र पाहुणे, शुभम काळबांडे, वसंत ब्राम्हणकर, आशिष पात्रे, अशोक पाटील, नरेश सोनेकर, भारत पगारे सह नप अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कन्हान शहर विकास मंच

कन्हान शहर विकास मंच द्वारे शुक्रवार दिनांक.२६ नोव्हेंबर २०२१ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे संविधान दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कन्हान शहर विकास मंच चे मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकाऱ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून व संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, महेंद्र साबरे, महेश शेंडे, भरत सावळे, हरीओम प्रकाश नारायण, महादेव लिल्हारे, कामेश्वर शर्मा, शाहरुख खान, सुरज वरखडे, हर्ष पाटील, किरण ठाकुर, प्रकाश कुर्वे, अक्षय फुले, शुभम मंदुरकर सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.

गोंडवाना गणतंत्र पार्टी कन्हान

डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी व्दारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुखलालजी मडावी यांचे हस्ते माल्यापर्ण करून विनम्र अभिवादन करित भारतीय संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी गोंगपा कन्हान अध्यक्ष सोनु मसराम बंडुजी इडपाची, सुरज वरखडे, चंद्रशेखर मसराम, संदीप परते, शंकर इनवाते, अरविंद मसराम सह सदस्य व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान

श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे ” माझे संविधान माझा अभिमान ” अंतर्गत शाळेचे संचालक श्री नरेंद्रजी वाघमारे साहेब, मुख्याध्यापिका वंदना रामापुरे यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान पुस्तिकांस पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व प्रास्ताविक हेमंत चांदेवार सर यांनी तर आभार प्रदर्शन नेहा गायधने हयांनी मानले. यावेळी हेमंत वंजारी, आयेशा अन्सारी, लीला खुरगे, जयश्री पवार,मंदाकिनी रंगारी, गीता वंजारी आणि समस्त शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यशवंत विद्यालय वराडा

यशवंत विद्यालय वराडा येथे शुक्रवार दिनांक.२६ नोहेंबर ला ” माझे संविधान माझा अभिमान ” अंतर्गत मुख्याध्यापिका के बी निंबाळकर यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान पुस्तिके ला पुष्पहार अर्पण करून मुख्याध्यापिका निंबाळकर मॅडम यांनी भारतीय संविधान विषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला. यावेळी श्री राजेंद्र गभणे सर, श्री राकेश गणविर सर, अर्चना शिंगणे, रोशन राऊत, मोतीराम रहाटे, दिपक पांडे सह शाळेचे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडी कन्हान

वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे शुक्रवार दिनांक.२६ नोव्हेंबर ला संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंनद नगर कन्हान येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नितिन गजभिये यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष नितेश मेश्राम व रंजनिश ऊर्फ बाळा मेश्राम यांनी संविधान दिवसा निमित्य उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर संविधानाचे वाचन करून संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी कन्हान शहराध्यक्ष नितेश मेश्राम, राजेंद्र फुलझले, रंजनिश ऊर्फ बाळा मेश्राम, सदस्य, लीलाबाई रंगारी, चिमणकर ताई, अमित पाटील, सोनु खोब्रागडे, दिलीप घोडेश्वार, निखिल मेश्राम, नितीन गजभिये, पवन मेश्राम, संदीप गजभिये, रोशन गजभि ये, बॉबी लांजेवर, मंगेश काठोके, मनीष शंभरकर, राहुल मोटघरे, प्रमोद सहारे, नितीन पानतवणे, रमेश गजभिये, अभिजित साखरे सह सदस्य गण उपस्थित होते.

कन्हान शहर काँग्रेस कमेटी

कन्हान शहर काँग्रेस कमेटी द्वारे शुक्रवार दिनांक.२६ नोव्हेंबर ला संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कॉग्रेस कमेटी कन्हान शहराध्यक्ष व नगरसेवक राजेश यादव यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाचे वाचन करून संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सुखलाल मडावी, रवींद्र रंग, पंकज गजभिये, सतीश भसारकर, प्रमोद बांते, अविनाश रायपुरे, स्वप्निल वाघधरे, सोनु मसराम सह काँग्रेस कार्यकर्ता गण उपस्थित होते.

संघमित्रा वंदना संघ कन्हान कांद्री

संघमित्रा वंदना संघ कन्हान कांन्द्री द्वारे शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर ला संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात संविधानाचे वाचन करुन संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी सारिका धारगावे , कल्पना पाटील , अमिता दहिवेलकर , सुकेशनी बागडे , जोसना ठवरे , रेखा रामटेके , इंद्रायणी पाटील ,शालीनी भेलावे ,
शिला बागडे ,रमा मेश्राम , माया हुमने , वैजंता बोरकर , सह आदि महिला प्रामुख्याने उपस्थित होते .

सत्य शोधक संघ

सत्य शोधक संघ द्वारे शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ ला संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सत्य शोधक संघ तर्फे सतिश भसारकर व निखिल रामटेके सोबत बुद्धिष्ठ.वेलफियर सोसायटी चे भगवान नितनवरे तसेच विनायक वाघधरे .यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांना संविधानाची प्रत वाटप करण्यात आली असुन संविंधान वाचन रजनीश मेश्राम यांनी केले.संविधान आज या देशाचा कणा आहे लोकांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम सविधान खऱ्या अर्थाने करत आहे असे प्रस्ताविक मध्ये प्रशांत वाघमारे यांनी सांगितले. नंतर भारत देशाची राज्य घटना कन्हान पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक मा.कदम साहेब व शेख साहेब यांना वाटप करण्यात आले आज जर कायदा व सुव्यवस्था सुरळीत चालत असेल तर ते सविंधना मुळे असे आपले मत पोलीस स्टेशन उपनिरीक्षक कदम साहेब यांनी मांडले ,नंतर प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे मुख्य चिकित्सक चौधरी साहेब यांना भारतीय सविंधान देण्यात आली वंचित व गरजू लोकांना आरोग्य सेवा मोफत व निःशुल्क देण्याचे अधिकार पण संविधान नमूद आहेत ,सेंन्ट्रल बैंक आॅफ इंडिया चे शाखा प्रबंधक श्रीमती घरडे मॅडम यांना सुद्धा भारतीय संविधान देण्यात आले त्यांच्या मते महिलांना चूल व मूल पासून मुक्ती देऊन महिलांना प्रगतीच्या शिखरावर पोहचवण्या मुख्य स्रोत म्हणजे संविधान आहे असे त्या म्हणाले या नंतर , व इतर प्रशासकीय अधिकार्यांना सुद्धा भारतीय राज्य घटना संविधाना वाटप करण्यात आली असुन कार्यक्रमात संविधानाचे वाचन करुन संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंगेश काटोके यांनी केली व आभार प्रदर्शन सत्तिष भसारकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे नेते विनायक वागधरे,भगवान नितनवरे,दौलत जी ढोके, कैलास बोरकर,महेंद्र चौहान, पाटील जी , सत्य शोधक संघ चे प्रशांत वाघमारे,सतीश भसारकर,रजनीश मेश्राम, शैलेश माटे,अशोक नारनवरे,मयुर माटे, गौतम नितनवरे,निखिल रामटेके,सोनु मसराम,मंगेश कांटोंके ,अखिलेश मेश्राम,सोनू खोब्रागडे,सतीश ऊईके, सुमित घोरपडे व बाल कन्या अनु मेश्राम, आयुषी मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते .

सर्वधर्म समभाव संघटन

कन्हान – सर्वधर्म समभाव संघटना द्वारे
शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर ला संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश बर्वे यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान , कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे , उपनिरीक्षक जावेद शेख , रोहित बर्वे सह आदि प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात संविधानाचे वाचन करण्यात आले . कार्यक्रमात उपस्थित उपस्थित सर्व नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी प्रशांत मसार , राजन तिवारी , कवडु पडोती , रविंन्द्र दुपारे , रामेश्वर ठाकुर , मिलींद मेश्राम , विलास शेंडे , अजय कापसीकर , मुकेश गंगराज सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रशांत मसार , चंदन मेश्राम , दिपक तिवाडे , अक्षय फुले , शुभम मंदुरकर सह आदि नागरिक उपस्थित राहुन सहकार्य केले .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रशांत मसार यांनी केले तर आभार चंदन मेश्राम यांनी मानले .

 

भाजपा अनु:सुचित जाती मोर्चा कन्हान शहर

भाजपा अनु:सूचित जाती मोर्चा कन्हान शहर द्वारे संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व संविधानाचे वाचन करुन संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला .
शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर संविधान दिवस निमित्य भाजपा अनु सुचित जाती मोर्चा कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता संविधानाचे वाचन करुन संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , भाजपा अनुसुचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष लिलाधर बर्वे , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , भाजपा अनुसूचित जाति मोर्चा शहर अध्यक्ष संजय रंगारी , ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष अमोल साकोरे , युवा मोर्चा शहर अध्यक विक्रांत सोलंकी , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका वर्षा लोंढे , रिंकेश चवरे , शैलेश शेळकी , मयुर माटे , सचिन वासनिक , सुनिल लाडेकर , कामेश्वर शर्मा , अजय लोंढे , मनोज कुरडकर , दिपंनकर गजभिए , रंजीत शिंदेकर , रुषभ बावनकर , अमन घोडेस्वार , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …