*शरद पवार यांचा काटोल मतदार संघात दौरा सुरु*

*शेतकर्यांच्या शेतमळ्यावर पोहचून स्वाता करताय पाहणी…*
मुख्य संपादक -किशोर ढुढेले (सावनेर)
*परतीच्या अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेत पीकांना मोठी नुकसानी पोहचवली असल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्यांना शासकीय मदत तात्काळ मीळावी व त्यांना मदतीचा हात मीळावा या करीता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार जिल्ह्यातील काटोल ,कामठी व उमरेड तालुक्यातील अतीक्षतीग्रस्त भागत स्वता पोहचून आढावा घेण्या करीता सकाळी काटोल तालुक्यात पोहचून शेतकर्यांच्या झालेले नुकसानीची पाहणी रुण त्यांच्याशी संवाद साधला.*
*परतीच्या पावसाने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू असून त्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे या गोष्टी गांभीर्याने घेत राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी पाठव विधानसभा क्षेत्रातील हातला चारगाव भारसिंगी काटोल आदी गावांतील शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी 14 नोव्हेंबर रोजी केली. यावेळी शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अनिल देशमुख माजी मंत्री रमेश बंग माजी आमदार आशिष देशमुख आमदार विजय घोडमारे आमदार प्रकाश गजभिये,दुर्गाप्रसाद पांडे,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कोंढाळी मार्ग मार्गे नागपूर जात असताना कोढाळी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक युवकांच्या वतीने शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले यावेळी कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्नील व्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश गजबे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत खंते, माजी ग्रा प सदस्य राजू गोलाईत उपस्थित होते.*
Maharashtra News Media सच की आवाज