Breaking News

*नवोदय जनोत्थान संघटन कन्हान द्वारे जागतिक दिव्यांग दिवस साजरा*

*नवोदय जनोत्थान संघटन कन्हान द्वारे जागतिक दिव्यांग दिवस साजरा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – जागतिक दिव्यांग दिवसा निमित्य नवोदय जनोत्थान संघटन कन्हान द्वारे दिव्यांग बांधवांचा सत्कार करून मागील पाच वर्षाचा शिल्लक दिव्यांग निधी त्वरित मिळण्याकरिता नगरपरिषदेचा घेराव करित निवेदन देऊन जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला.


शुक्रवार दिनांक.३ डिसेंबर ला नवोदय जनोत्थान संघटन कन्हान द्वारे जागतिक दिव्यांग दिना निमित्य कन्हान शहरातील सर्व विकलांगाना पोलीस स्टेशन कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे व संघटन अध्यक्ष प्रविण गोडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन दिव्यांगाचा सत्कार करण्यात आला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था द्वारे दिव्यांग कल्याण योजना अंतर्गत ५% निधी राखीव ठेऊन त्याच वर्षी खर्च करने अपेक्षित आहे. परंतु होत नसल्याने नवोदय जनोत्थान संघटन कन्हान अध्यक्ष प्रविण गोडे च्या नेतृत्वात नगरपरीषद कन्हान च्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याकरीता गेले असता उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन लावण्यात आले. ग्राम पंचायत चे नगरपरीषद मध्ये विलनीकरन होऊन ७ वर्ष पूर्ण झाले असुन फक्त सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाचा दिव्यांग निधी मिळाला आणि शिल्लक ५ वर्षाची निधी त्वरित मिळ ण्याकरीता न.प. कन्हान चा घेराव करून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघटन अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष संजय रंगारी, सचिव प्रदिप बावने, सहसचिव अभिजित चांदुरकर, कोषाध्यक्ष सतीश उके, सदस्य मनिष शंभरकर, प्रकाश कुर्वे, प्रविण माने, सोनु खोब्रा गडे, अश्विन भिवगडे, सागर फरकाडे, जयंत थोडा, जैश रामटेके, अब्दुल रहीम, बबन पटेल, कमलसिंग ईन्वाते, बबिता सावरकर, प्रकाश मानवटकर, स्वप्निल मेश्राम, आकाश खोब्रागडे सह आदि दिव्यांग बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …