Breaking News

*कन्हान शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दिली श्रद्धांजलि* *विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दिली श्रद्धांजलि*

*विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिवस निमित्य विविध संघटने द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून दोन मिनिट मौन धारण करून भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करुन महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला .

कन्हान शहर विकास मंच

कन्हान शहर विकास मंच द्वारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच चे मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित मंच सदस्य हर्ष पाटील व महादेव लिल्हारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व मंच पदाधिकाऱ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे मार्गदर्शक भरत सावळे, संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव हरीओम प्रकाश नारायण, कोषाध्यक्ष महेश शेंडे, पत्रकार रवि दुपारे, महादेव लिल्हारे, हर्ष पाटील, सुरज वरखडे, शाहरुख खान, प्रकाश कुर्वे, किरण ठाकुर, अक्षय फुले , शुभम मंदुरकर सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस स्टेशन कन्हान

कन्हान पोलीस स्टेशन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, शिपाई कर्मचारी आदिं नी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कन्हान पोली स स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक अमित कुमार आत्राम, सतिश मेश्राम, खुशाल रामटेके, जयलाल सहारे, मंगेश सोनटक्के, मंगेश ढबाले, शरद गिरते, शालीकराम महाजन, विरेंद्र चौधरी, गणेश पाल सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

वेकोलि खुली कोळसा खदान, उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालय गोंडेगाव

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिवसा निमित्य वेकोलि खुली कोळसा खदान, उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालय गोंडेगाव येथे उपक्षेत्रीय प्रबंधक श्री तरुणकुमार त्रिवेदी यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करून मान्यवरानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवना वर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व गोंडेगाव वेकोलि प्रबंधक कार्यालय च्या अधिकार्यानी व कर्मचाऱ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र श्रद्धांजली अर्पण करून महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी खदान प्रबंधक अमीर चतुर्वेदी, सर्वेअर विम लकुमार शर्मा, अशोक चकोले, सुब्रत सिन्हा, गौतम कुमार, देवाशिश मुखर्जी, संजय चौहान, एस के जमा, राकेश यादव, मनोज प्रसाद, इलीयास अहमद आदी अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित

वंचित बहुजन आघाडी कन्हान

संविधानाचे शिल्पकार, क्रांतीसुर्य, महामानव, विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ व्या महापरिनिर्वाण दिवसा निमित्य वंचित बहुजन आघाडी कन्हान द्वारे गहुहिवरा चौक आनंद नगर कन्हान येथे वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर अध्यक्ष नितेश मेश्राम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून दोन मिनट मौन धारण करून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी विधानसभा उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले, सचिव शैलेश भाऊ ढोके, सुशील कळमकर, प्रवत्ता रंजनिश ऊर्फ बाळा मेश्राम, अशोक नारनवरे, सोनु खोब्रागडे, मनिष शंभरकर, विजय बहादुरे, बाळु नागदेवे, सचिन मेश्राम, विक्रम सोमकुवर, लालचंदजी राऊत, मनोज गोंडणे, सोनु पवनीकर, विनोद चिंमणकर, संदीप गजभिये, लांजेवारजी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सुजाता महिला मंडळ कन्हान

भारतरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या महपरिनिर्वाण दिनानिमित्य सुजाता महिला मंडळ कन्हान द्वारे आंबेडकर नगर नाका नंबर ७ कन्हान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून बुद्ध वंदना घेऊन मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमास सुजाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौं.चंपाबाई गजभिये, मालनबाई ढोके, सत्य भामा डहाट, शालिनी रामटेके, माजी सरपंच दौलतजी ढोके, बाळु नागदेवे, संजय रंगारी, दिपंकर गजभिये सह नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

भाजपा अनु:सुचित जाती मोर्चा कन्हान शहर

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिवसा निमित्य भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कन्हान शहर द्वारे आंबेडकर चौक कन्हान येथे भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुकाध्यक्ष लिलाधर बर्वे, भाजपा अनुसूचित जाति मोर्चा कन्हान शहराध्यक्ष संजय रंगारी यांच्या हस्ते डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून दोन मिनटाचे मौनधारण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करून महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष लीलाधर बर्वे,भाजपा कन्हान शहराध्यक्ष डॉ. मनोहर पाठक, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कन्हान शहराध्यक्ष संजय रंगारी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्हा ग्रामिण मंत्री रिंकेश चवरे, पारशिवनी तालुका महामंत्री सचिन वासनिक, कन्हान शहर महामंत्री सुनील लाडेकर, कन्हान शहर ओबीसी आघा डी अध्यक्ष अमोल साकोरे, भाजपा तालुका महिला आघाड़ी अध्यक्ष सरिता लसुंते, स्वाती पाठक, शहराध्य क्ष तुलेषा नानवटकर, राखी परते, प्रतीक्षा चवरे, देशभ्र तार ताई, अमन घोडेस्वार, ऋृषभ बावनकर, दिपंकर गजभिये, चंद्रगुप्त पानतावणे, धम्मयश उके, माधव वैद्य, आकाश वाडणकर, अदरीराम कनोजिया सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …