*मेग्मो ची नवीन कार्यकारणी पडवे अध्यक्ष तर उमरगेकर सचीव*

*मेग्मो ची नवीन कार्यकारणी पडवे अध्यक्ष तर उमरगेकर सचीव*

काटोल प्रतिनीधी- दुर्गाप्रसाद पांडे

काटोल – महाराष्ट्र राज्य राजपत्रीत वैद्यकिय अधिकारी ‘गट अ’ संघटना (मॅग्मो) जिल्हा नागपूर ची नवीन कार्यकारीणी गठीत – दि ०४-१२-२०२१.
दि- ०४-१२-२०२१ ला आरोग्य विभाग जिल्हा प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे महाराष्ट्र राज्य राजपत्रीत वैद्यकिय अधिकारी ‘गट अ’ संघटनेची नवीन कार्यकारीणी गठणाची बैठक पार पडली.
विशेष बाब म्हणजे ५ माजी जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थितीत सदर बैठकीत नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
डॉ. एस.एल. कुडवे, डॉ. एन. आर. भेंडे, डॉ. अशोक पवार, डॉ. संजय मानेकर व डॉ. विद्यानंद गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत
डॉ. हर्षवर्धन मानेकर तत्कालीन सचिव यांनी उपस्थितांचे शब्दसुमनाने स्वागत करून सभेला सुरुवात केली.
प्रथमतः वैद्यकिय अधिकारी यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली तथा त्यावर संघटकीय माध्ममातून निरसन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
डॉ. हर्षवर्धन मानेकर यांचे सुचनान्वये ‘सदर गठन हे Election नव्हे तर Selection पद्धतीने पार पाडावे’ अनुषंगाने ऐच्छिक वा सूचित व्यक्तीला उपस्थितांनी अनुमोदन करून संपूर्ण कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
अध्यक्ष -डॉ. प्रविण डी. पडवे
सचिव -डॉ. प्रविण उमरगेकर
कोषाध्यक्ष -डॉ. संदीप धरमठोक
कार्याध्यक्ष -डॉ. पराग नारखेडे
सहअध्यक्ष -डॉ. राजेश गिलानी
डॉ. सुषमा धुर्वे
डॉ. शशांक व्यवहारे
सहसचिव -डॉ. चेतन नाईकवार
डॉ. सोनाली बाके
डॉ. रुपेष नारनवरे
संघटक -डॉ. तारिक अंसारी
सहसंघटक -डॉ. श्याम खोब्रागडे
राज्यप्रतिनिधी -डॉ. आसिम ईनामदार
डॉ. सचिन हेमके
तालुका प्रतिनिधी – डॉ. संजय निकम, डॉ. प्रविण राऊत,
डॉ. दिपा कुलकर्णी, डॉ. प्रशांत वाघ, डॉ. विवेक सक्सेना.
उर्वरित कार्यकारी सदस्य नियुक्तीबाबत विशेष बैठकित चर्चा करून सर्व घटक समावेशक कार्यकारिणी पूर्णत्वास आणण्याचे ठरविण्यात आले.
नवीन कार्यकारिणी प्रतिनिधींना पदासीन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
राज्य कार्यकारिणी सरचिटणिस डॉ. प्रमोद रक्षमवार यांनी फोन द्वारे नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
सभेअंती नवनियुक्त अध्यक्ष व सचिव यांनी उपस्थित मान्यवर व सदस्य वैद्यकिय अधिकारी यांचे आभार मानून सभेची सांगता केली.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …