Breaking News

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन*

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी -दिलीप येवले
कोराडी:- उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन येथे ६ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त्य आयोजित कार्यक्रमात विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सौ. वैशाली फुले यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. दलित आदिवासी आणि महिलांची प्रगती व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कशाप्रकारे आपले आयुष्य झिजविले व भारताला सुंदर स्वरूप प्राप्त करून दिले यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच समाजघटकाचा सर्वांगीण विकास व्हावा हीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत सुद्धा त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल टेकाडे ह्यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या गौरवशाली कामाबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. प्रा. तृप्ती डोंगरे यांनी आपल्या आदरांजलीपर भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन नव्या पिढीला कशाप्रकारे मार्गदर्शन करणार आहे हे पटवून दिले. या प्रसंगी कॉलेजचे सर्व शिक्षकवृंद प्रा. रुबिका नारनवरे, डॉ. निर्मला सूर्यवंशी, प्रा. रश्मि ऊईके, प्रा. रोशनी डहारे, रासेयो प्रमुख प्रा. तृप्ती डोंगरे, प्रा. प्रिती मानकर, प्रा. हुस्ना झकी, प्रा. कविता कनोजिया, तसेच सहकर्मचारी निलेश मेश्राम, पवन करमेले, श्रीमती दीपाली उईके, ग्रंथपाल, श्री गौरव गावंडे, मधुकर डांगे, कुसुम ताई व वंदना ताई यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. प्रास्ताविक कु. फराह खान बॅचलर ऑफ न्यूट्रीशन अँड डायटेटिक्स भाग-२ तर आभार प्रदर्शन कु. ऐश्वर्या मुन भाग १ ह्यंनी केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …