*अर्धवट रस्ते बांधकाम त्वरीत सुरु करण्याची मागणी*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः वार्ड क्र. 5 मधील सटवामाता मंदिर ते नकाशे यांच्या घरापर्यंतचा 17 लाख 78 हजार 316 रुपये खर्चाचा सीमेंट रस्ता सावनेर नगर परिषद कडून मंजूर करण्यात आला असुन अद्यापही रस्ता बांधकामाचे मुहूर्त निघने शेष असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नवीन सीमेंट रस्ता निर्माण व्हावा याकरिता परिसरातील सामाजिक कार्यकर्ता विनीत पाटिल व स्थानिक नागरिकांद्वारे प्रभाग सदस्याकडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या होत्या. त्यातक्रारीचे निराकरण करण्यासाठी प्रभाग सदस्य यांच्या प्रयत्नाने नपा सावनेर मार्फत सटवामाता मंदिर ते नकाशे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याला मंजुरी मिळविन्यात आली.
संबंधित कंत्राटदाराने रस्त्याचे कामही सुरू केले मात्र कासव गतीने काम करत केवळ मुरूम व गिट्टी टाकून पुढील काम त्याच अवस्थेत ठेवण्यात आले.यामुळे टाकन्यात आलेली मुरुम पाउसाने वाहून गेली व रस्ते वरील गिट्टी उखडलेली असून रस्तेमध्ये गड्ढे निर्माण झाले त्यामुळे स्थानिय नागरिकांना रहदारीला ये-जा करण्यास त्रास होत आहे.

अनेक महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप रस्ता निर्माणकार्य करणार्या ठेकदारावर नगर प्रशासनाचे वचक नसल्याने सदर रस्ता बांधकाम रडखडलेला असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना पुढे जावे लागत आहे.नगर प्रशासनाने सदर कांत्रटदाराला योग्य समझ देऊन अर्धवट असलेल्या रस्ते निर्माण कार्यास पुर्ण करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या समस्येतून मार्ग काढण्यासाठी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विनीत पाटील यांच्या पुढाकारात स्थानिक नागरिकांनी न.प. मुख्याधिकारी सावनेर यांना विलंब न लावता रखडलेले काम सुरू करण्याची मागणी केली असता निवेदन ही दिले आहे.

सदर अपूर्ण सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण करण्याची परवानगी मुख्याधिकारी सावनेर यांचे व्दारे सदर विषयावर कोणते पाऊल उचलल्या जाते याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
*याप्रसंगी युवा समाजसेवी विनीत पाटिल सह ,पवन राऊत, अक्षय आवारी,प्रशांत उके, भूषण आवारी, विकी शेंडे, भरत धुंडूळे, मयूर शेंडे,राहुल नाहरकर,आदेश चरपे, अभिषेक दास,आकाश ढोके ,नावेद शेख,सुनील मानकर, अक्षय बिलवार, जयदीप खाटिकर,शुभम चौधरी, रोहन जरारे, संकेत गमे,सोनू हजारे, शुभम जोगी,मोनू देरकर, अभिषेक साराटे, मुकेश बंसोड ,अक्षय नकाशे,प्रतीक लाटकर,प्रणय लाटकर,मयूर गाडगे इत्यादि नागरिक उपस्थित होते*
Maharashtra News Media सच की आवाज