Breaking News

*ड्राइव्ह अँड डाइन रेस्टाॅरंट मधील हुक्का पार्लर वर धाड* *मौजा कवडस येथे स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण ची कारवाई*

*ड्राइव्ह अँड डाइन रेस्टाॅरंट मधील हुक्का पार्लर वर धाड*

*मौजा कवडस येथे स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण ची कारवाई*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर: तालुक्यात सावनेर पोलीस स्टेषन अंतर्गत मौजा कवडस शिवारातील सावनेर-नागपूर महामार्गावरील ड्राईव्ह अँड डाईन रेस्टाॅरंट येथे अवैधरित्या सुरू असलेल्या विदेशी दारू विक्री व हुक्का पार्लर वर स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण द्वारे धाड टाकून 9,119/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

*मिळालेल्या माहिती नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सावनेर उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत मौजा कवडस शिवारातील सावनेर-नागपूर महामार्गावरील ड्राईव्ह अँड डाईन रेस्टाॅरंट येथे अवैधरित्या सुरू असलेल्या विदेशी दारू विक्री व हुक्का पार्लर सुरू असल्याची खात्रीशिर गोपनीय माहिती मिळताच पोलीस स्टाफसह नमुद ठिकाणी कार्यवाही केली असता तेेथे विदेशी दारू व हुक्क्याचे साहित्य, हुक्का पाॅट, चिलम, पाईप मिळुन आल्याने आरोपी 1) सिध्दार्थ सुनिल अग्रवाल वय 36 वर्षे, रा. सदर नागपूर व 2) अजय मंगलसिंग राठोड वय 29 वर्षे रा. आर्णी जिल्हा यवतमाळ यांचे ताब्यातुन विदेशी दारू व हुक्क्याचे साहित्य ज्यामध्ये हुक्का पाॅट, हुक्का चिलम, पाईप इत्यादी व प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु असा एकुण 9,119/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन सावनेर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.ही कारवाई दिनांक 11.12.2021 रोजी आँल आऊट आँपरेशन दरम्यान नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणिकर यांचे मार्गदर्शनात पोनि अनिल जिट्टावार, सहा.पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस नाईक आशिष मुंगळे, किशोर वानखेडे, उमेश फुलबेल, पोलीस शिपाई रोहन डाखोरे, अशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …