*कन्हान येथे बाॅटम सर्विस विधृत तारा चा शॉक लागुन गवंडी (मिस्त्री) कामगाराचा मुत्यु*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग चा गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत एक किलो मीटर अंतरावर उत्तर भागात असलेल्या अशोक नगर कन्हान येथे एका गवंडी (मिस्त्री) कामगार भिंत प्लॉस्टर करतांना बाॅटम चा विधृत ताराला स्पर्श होऊन शॉक लागुन मुत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलीस सुत्रान कडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार मृतक अशोक महाजन पगरवार अंदाजे वय २६ वर्ष राहणार. वार्ड क्रमांक. १ इंदिरा नगर कांद्री हा घर बांधकामाचे गवंडी (मिस्त्री) चे काम करतो. शनिवार दिनांक.११ डिसेंबर २०२१ ला सायंकाळी ४:३० ते ५:०० वाजता दरम्यान मृतक अशोक महाजन पगरवार हा जुगाळावर उभे राहुण सहा फुटा च्या बाॅटम ने भिंतीला प्लाॅस्टर करीत असतांना बाॅटम चा विधृत सर्विस ताराला स्पर्श होऊन विधृत शॉक लागुन खाली पडल्याने त्यास उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेले असता डाॅक्टरने तपासुन मृत घोषित केले. सदर मृतकाच्या मरणाला घरमालक धनराज बातुलवार व ठेकेदार सुधाकर मेश्राम यांच्या निष्काळजीपणामुळे व कोणत्याही प्रकारचे सुरक्षित तेचे साधन न वापरल्यामुळे अशोक पगरवार यांस विधृत शाॅक लागुन मुत्यु झाला आहे. अश्या फिर्यादी आशिष अजबराव बैठवार वय २१ वर्ष राहणार. वार्ड क्रमांक. १ इंदिरा नगर कांद्री यांच्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अपराध क्रमांक. ४८/२०२१ कलम १७४ जाफौ कायदान्वये मर्ग चा गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे हवालदार खुशाल रामटेके, व मंगेश ढबाले हे करीत आहे.