Breaking News

*वीज तांत्रिक कामगारांना अतिकालिक कामाचा फरक देण्याचा नागपूर उच्य न्यायालयाचा निकाल* *१९८८ च्या वेतनवाढीचा ओव्हरटाईम फरक मिळावा यासाठीचा न्यायालयीन लढा नागपूर उच्य न्यायालयात विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने जिंकला*

*वीज तांत्रिक कामगारांना अतिकालिक कामाचा फरक देण्याचा नागपूर उच्य न्यायालयाचा निकाल*

*१९८८ च्या वेतनवाढीचा ओव्हरटाईम फरक मिळावा यासाठीचा न्यायालयीन लढा नागपूर उच्य न्यायालयात विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने जिंकला*

 

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- प्रचलित पद्धती प्रमाणे 1988 च्या अगोदर पगार वाढीचा फरक देतांना ओव्हरटाईम चा पण फरक मिळायचा .. 1988 पासूनच्या झालेल्या पगारवाढीचा फरक दिला परंतु ओव्हरटाईम चा फरक न दिल्यामुळे त्यावेळेसचे संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री. बापू देशमुख साहेब कोराडी यांनी 29 जानेवारी 1990 ला मा.नागपूर लेबर कोर्टात केस दाखल केली. तेव्हा पासून मा. हायकोर्टाच्या सिंगल बेंचसह युनियनने तीन ठिकाणी वेगवेगळ्या बेंचला केस जिंकली.. मा.नागपूर हायकोर्टात डबल बेंचला जवळपास पाच वर्षापासून केस सुरू होती ती दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी संघटनेने जिंकली त्याची अधिकुत प्रत दिनांक 9 डिसेंम्बर 2021 रोजी प्राप्त झाली.. संघटनेच्या वतीने प्रथम पासूनच ही केस अँडव्होकेट बी. एम.खान यांनी लढली..प्रथम लेबर कोर्टात निकाल लागताना फक्त संघटनेच्या सभासदांसाठी लागू झाला होता.. तोच निकाल पुढे कायम राहिला होता.. २६ नोव्हेंबर रोजी मा.नागपूर उच्य न्यायालयाच्या डबल बेंचने तोच निकाल कायम ठेवला आहे..वेतन करारावर सह्या करणाऱ्या प्रमुख संघटनांनी त्यावेळी अतिकालिक कामाचा फरक नको अशी भूमिका कोर्टात घेतली ..विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनची देखील सही करारावर होती.. मात्र अतिकालिक कामाचे वेतन हे वेजेस नुसार मिळत असल्याने तसेच एनमाली मध्ये हा विषय आल्याने त्यातील चर्चेनंतर संघटनेचे माजी के. उपाध्यक्ष मा.के. पी.राऊत साहेब यांचेशी सल्लामसलत करून श्री.बापू देशमुख साहेब कोराडी माजी केंद्रीय उपाध्यक्ष यांनी नागपूर लेबर कोर्टात केस दाखल केली. याकामी अनेक आजी माजी केंद्रीय पदाधिकारी, झोन पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाले, मार्गदर्शन मिळाले आर्थिक मदत सुद्धा त्यांच्याकडून मिळाली .. सर्वांचेच सहकार्याने या निकालाला यशाची झालर प्राप्त झाली आहे.. परंतु मा.के. पी.राऊत साहेब, बापू देशमुख साहेब, गजानन सुपे साहेब यांची चिकाटी व मेहनत यामुळेच निकाल संघटनेच्या बाजूने लाऊन घेण्यात संघटना यशस्वी झाली ..प्रथम पासून म्हणजे १९९० पासून केस ताकतीने लढून न्याय मिळवून दिल्या बद्दल अँड बी. एम. खान यांची दिनांक 10 डिसेंम्बर रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन माजी केंद्रिय उपाध्यक्ष सर्वश्री. के.पी.राऊत सो ,बापूसाहेब देशमुख सो, गजानन सुपे सो ,विद्यमान केंद्रिय उपाध्यक्ष श्री. शैलेंद्र अर्जितवार सो, माजी के.कोषाध्यक्ष मुंगसे सो, झोन सचिव खापरखेडा श्री.विलास शेंडे यांनी व इतर पदाधिकारी यांनी धन्यवाद दिले.. आणि सत्कारही केला…

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनसह सर्वच संघटनांनी या बाबीवर फारसा विरोध न करता वीज मंडळाशी सहमती दर्शवून अतिकालिक कामाच्या वेतनातील फरक न देण्यावर सहमती दर्शविली होती. अशातही तत्कालीन केंद्रीय उपाध्यक्ष, यांनी संघटनेच्या वतीने २९ जानेवारी १९९० ला नागपूर औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. वीज कामगारांना १एप्रिल १९८८ ते ३१ मार्च १९९० या दरम्यान केलेल्या ओव्हर टाईम च्या कामाचा मोबदला देतांना वाढीव वेतनानुसार मोबदला देण्यात आला नाही. कामगारांना असलेल्या वेतनाच्या दरानुसार ओव्हर टाईम चा मोबदला मिळावा, हा त्यांचा हक्क आहे अशी मागणी केली. औद्योगिक न्यायालयात बापूसाहेब देशमुख यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर वीज मंडळाने यावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण दाखल केले. सिंगल बेंच समोर या प्रकरणाचा निकालही वीज मंडळांच्या विरुद्ध लागला. पुढे वीज मंडळाने ने उच्च न्यायालयात डबल बेंच समोर पुन्हा अपील केली. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रकरणाचा निकाल देताना माननीय उच्च न्यायालय यांनी कामगारांची बाजू ग्राह्य धरून विद्युत क्षेत्रातील चारही कंपनीतील वीज तांत्रिक कामगारांना अतिकालिक कामाचा मोबदला देताना त्यांच्या वेतनाच्या दरानुसार द्यावा असा निर्णय दिला आहे. या निर्णयाने तत्कालीन कालावधीत ओव्हरटाइम करणाऱ्या राज्यातील शेकडो वीज तांत्रिक कामगारांना ओव्हरटाईम वेतनातील फरक मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे त्या वेळेला वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी वीज मंडळासोबत झालेल्या करारानुसार ओव्हरटाइम मधील वेतनाचा फरक न देण्याला लेखी सहमती दर्शवली होती. असे असतानाही मा. न्यायालयाने मात्र कामगारांचा हा हक्क आहेतो वेतनवाढी नुसारच ओव्हरटाईमचा फरक त्यांना दिला जावा ,त्यांचा हक्क नाकारला जाऊ शकत नाही, असे मत नोंदवीत कामगारांना १एप्रिल १९८८ ते ३१मार्च १९९० कालावधीतील ओव्हरटाईम वेतनाचा वाढीव मोबदला देण्यात यावा असा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाने विद्युत क्षेत्रातील चारही कंपनीतील निवृत्त तांत्रिक कामगारांना दिलासा मिळाला आहे..चारही कंपनीतील कामगारांना ओव्हर टाइम मध्ये काम करावे लागते ,पूर्वी हा ओव्हरटाइम सरासरीने दर महिन्याला दोनशे ते अडीचशे तास असायचा .कालांतराने ओव्हरटाईम चा कालावधी कमी झाला . आजही या कामगारांना दर महिन्याला पंचवीस ते तीस तासापेक्षा जास्त वेळ अतिकालिक काम करावे लागते .या निकालाने१९८८ ते १९९० या कालावधीतील फरक मिळेलच परंतु १९९३, १९९८, २००३ ,२००८ , २०१३ व २०१८ ला झालेल्या वेतन निश्चिती बाबतही ओव्हरटाईम मधला फरक मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …