*कांद्री येथे श्री दत्त जयंती महोत्सव चे आयोजन*
*दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कांद्री येथील श्री दत्त मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात दत्त जयंती महोत्सव साजरा केला जातो. परंतु मागील दोन वर्षापासुन शहरात व परिसरात कोरोना चा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने श्री दत्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नसल्याने या वर्षी दोन दिवसीय कार्यक्रमाने श्री दत्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

कांद्री- कन्हान परिसरातील श्री दत्त मंदिरात शनिवार दिनांक. १८ ते १९ डिसेंबर असे दोन दिवसीय दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . यात आज शनिवार दिनांक १८ डिसेंबर श्री दत्त जयंती दिवशी सकाळी १० वाजता घटस्थापना करुन महोत्सवाची सुरूवात करण्यात येणार असुन दुपारी १ वाजता रामायण पाठ , सायंकाळी ४ वाजता श्री दत्त पालखी सह शोभायात्रा काढण्यात येईल. रात्री ७ वाजता भजन किर्तना चा कार्यक्रम रविवार दिनांक.१९ डिसेंबर ला दुपारी २ वाजता दहीकाला व प्रसाद वितरण करून सायंकाळी बाल गोपालांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या श्री दत्त जयंती महोत्सव निमित्य कांद्री येथील श्री दत्त मंदीरात आकर्षक विद्युत रोषनाई ने मंदीर सजविण्यात आले आहे.

सर्व भाविक भक्तानी दोन दिवसीय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नरेश पोटभरे, कवडुजी आखरे, पुरूषोत्तम वझे, वंडुजी बानवकुळे, रंगराव पोटभरे, रामाजी हिवरकर, शिवाजी चकोले, बाळाजी सरोदे, उषाबाई वंजारी, शोभाताई वझे, कांताबाई ठाकरे, इंदिरा बाई, सुनिता हिवरकर सह सर्व आयोजकांनी केले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज