*कन्हान परिसरात बँक शाखेचा दोन दिवसीय संप १०० टक्के यशस्वी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान परिसरातील बँकेचा दोन दिवसीय संप १०० टक्के यशस्वी करण्यात आला. भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक कन्हान, युनियन बँक कांद्री, इंडियन बँक कोलमाईन्स, युको बँक गोंडेगाव येथे प्रदर्शन करित बँकेच्या खासगीकरणाचा तीव्र विरोध दर्शविण्यात आला.

सर्व बँक कर्मचारी आणि सर्व बँक युनियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. दिनांक.१६ व १७ डिसेंबर रोजी देशातील राज्यातिल, जिल्हातील तसेच पारशिवनी तालुक्यातील कन्हान परिसरातील सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी मालकी च्या) बँकांतील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी या देशव्यापी संपा सहकार्य केले. या संपात ३५ च्या वर कर्मचार्यांनी सहभाग नोंदविला. संसदेच्या चालु अधिवेशनात केंद्र सरकार बँकिंग रेग्युलेशन अँक्ट १९७०, १९८० या कायद्यात दुरुस्ती करून सरकार मालकीच्या असलेल्या बँकांचे खासगी करण करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहे. बँक ग्राहक, ठेवीदार, भागधारक, अर्थ तज्ज्ञ व अन्य राजकीय पक्ष संघटना या कोणालाही विश्वासात न घेता त्यांचा विरोध डावलुन सरकार हा देशहित विरोधी निर्णय घेत आहे. खाजगीकरण म्हणजे सरकार आपली मालकी हक्क सोडुन देणार आणि या बँका उद्योग पती व उद्योगघराणी यांच्या ताब्यात देणार असल्याचा कर्मचार्यांचा आरोप आहे. अर्थ व्यवस्थेवर अनिष्ट परिणाम करणार्या या गोष्टींसाठी आपला या धोरणा ला विरोध आवश्यक असुन देश हिताचे रक्षण करण्यासाठी हा संप संयुक्त कृती समिती नागपुर जिल्हया च्या वतीने पुकारण्यात आला होता. या प्रसंगी कन्हान परिसरातील सर्व बँके च्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून संप १०० टक्के यशस्वी केला .
Maharashtra News Media सच की आवाज