Breaking News

*नागपुर येथे रांगोळी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न* *शक्ती माता महिली समिति द्वारे स्पर्धेचे आयोजन*

*नागपुर येथे रांगोळी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न*

*शक्ती माता महिली समिति द्वारे स्पर्धेचे आयोजन*

प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

नागपुर – नागपुर येथे शक्ती माता नगर परिसरात शक्ती माता महिली समिति आयोजक कविता रेवतकर द्वारे शक्ती माता नगर च्या महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धा मध्ये शेकडो महिलांनी स्वयंमफुर्तिने सहभाग नोंदवुन परिसरात दिवाळी सदृश्य परिस्थीती निर्माण केली असुन या स्पर्धेत एका चिमुकल्या मुलीने कोरोना च्या ताज्या विषयावर रांगोळी काढुन त्या खाली “कोरोना से न घबराए – खुद बचे और दुसरे को बचाए हा एक महत्वपूर्ण संदेश शब्दांकित करुन रांगोळी स्पर्धा मोठ्या उत्साहात थाटात संपन्न करण्यात आली .
रविवार दिनांक. १२ डिसेंबर २०२१ ला दुपारी. २:०० ते ४:०० वाजता पर्यंत शक्ती माता महिला समिती आयोजक कविता रेवतकर द्वारे शक्ती माता नगर च्या महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली‌ असुन या रांगोळी स्पर्धे मध्ये शक्ती माता नगर परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून शक्ती माता नगर परिसरात दिवाळी सदृश्य परिस्थिती निर्माण करुन एका चिमुकल्या मुलीने कोरोना च्या ताज्या विषयावर रांगोळी काढुन त्या खाली “कोरोना से न घबराए – खुद बचे और दुसरे को बचाए हा एक महत्वपूर्ण संदेश शब्दांकित करुन कोरोना काळातील सर्व नियमाचे काटेकोर पणे पालन करावे असे आव्हाहन एका चिमुकल्या मुलीने नागरिकांना केले आहे . ही रंगोळी स्पर्धा गट १ :- ५ वर्ष ते १५ वर्षा पर्यंत च्या मुलींसाठी व
गट २ :- १५ वर्ष ते त्या पुढील वयोगटासाठी आयोजित केलेली होती. ह्या रांगोळी स्पर्धेत ११० महिला-मुलींनी मोठ्या संख्येत भाग घेऊन सहभाग नोंदविला असुन ह्या रांगोळी स्पर्धे मध्ये गट १ मधुन शंतनु डोडस्कर यांना प्रथम पुरस्कार मिळाला असुन परी गोरख यांना द्वितीय पुरस्कार मिळाला असुन समीक्षा नीनदेवार हिला तृतीय पुरस्कार मिळाला असुन अबोली पिंपळकर हिला चौथा पुरस्कार मिळाला असुन
वैष्णवी भोयर हिला पाचवा पुरस्कार मिळाला .तसेच गट २ मध्ये प्रणाली बिंझाडे हिला प्रथम पुरस्कार मिळाला असुन , उज्वला रेवतकर हिला द्वितीय पुरस्कार मिळाला असुन श्वेता पात्रे हिला तृतीय पुरस्कार मिळाला असुन
सोनाली बिरोले हिला चौथा पुरस्कार मिळाला असुन प्रांजली मानेकर हिला पाचवा पुरस्कार मिळाला असुन उत्कृष्ट प्राईज समन्वी मनोज पंधराम ह्या सहा वर्षाच्या मुलीला मिकी माऊस बनविल्या बद्दल देण्यात आले.


या प्रसंगी शक्ति माता महिला समिति द्वारे ज्येष्ठ नागरिकांना शाॅल , श्रीफल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी संध्या नवकरकर , सोनाली घोडमारे , मनीषा थिलघडे मनीषा कोठे , संगीता चकोले , बंटी कुकडे , निर्मलाबाई रेवडी ,शांताबाई मांधाता , मोरेश्वर पंधराम, प्रभाकर तापस , हेमंत भाऊ सेलोकर , राजेश भाऊ आंबेकर , सुनील अवचट सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता
कविता रेवतकर , दीप्ती चरडे, राजेश्री घाटोळे , मनीषा रेवतकर, मंदा काटे , रिता नायक , दिपाली भोयर , ज्योती गोरडे , वनिता आंबेकर , मेघा सोनटक्के , अंजू भटनागर , रजनी घंगारे , वर्षा मेंढे , सोनाली इगे , दिपाली पांनधरम , पूजा देवतळे सह आदि ने सहकार्य केले .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मीनाक्षी गजभिए यांनी केले तर आभार कविता रेवतकर यांनी मानले .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …