*मोठी बातमी*
*कांद्री येथे योग बार समोर एका युवका वर चाकुने हल्ला*
*आरोपी फरार , परिसरात खळबळ*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री येथे योग बार समोर एका युवका वर चाकुने हल्ला झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान पोलीसांनी पुढील तपास सुरु केला असुन फरार आरोपीचा शोध घेत आहे .
पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार गुरुवार दिनांक २३ डिसेंबर २०२१ ला रात्री ०९:०० ते १०:०० वाजता च्या दरम्यान कांद्री येथे योग बार समोर एका युवका वर काही आरोपींनी चाकुने हल्ला करुन जख्मी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . परंतु आरोपींनी युवका वर चाकुने हल्ला का केला अजुन ही स्पष्ट झाले नाही . सदर प्रकरणाची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली असता घायल युवकाला त्यांचा मित्रांनी तारसा रोड येथील वानखेडे हाॅस्पिटल येथे उपचारा करिता नेले असता तेथील डाॅक्टरांनी त्याला कामठी राॅय हाॅस्पिटल येथे रेफर केल्याची माहिती मिळाली आहे .
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीस पुढील तपास करीत असुन फरार आरोपीचा शोध घेत आहे .
बातमी लिहल्या पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झालेला नाही .