Breaking News

*शिक्षकांचे प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातून एकाचवेळी निवेदन* *तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व ग्राम विकास मंत्र्यांना निवेदन*

*शिक्षकांचे प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातून एकाचवेळी निवेदन*

 

*तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व ग्राम विकास मंत्र्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा तर्फे राज्यभर एकाच वेळी तहसिलदारा मार्फत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व ग्राम विकास मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. नागपुर जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांतुन तहसिलदार मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. पुढील टप्प्यात सर्व जिल्ह्य़ात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व त्यानंतर मुंबई येथे संघटने तर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आहेत मागण्या – जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी, शिक्षण सेवक पद्धत बंद करून, नियमित शिक्षकाची नेमणूक करावी तसेच कार्यरत शिक्षण सेवकांचे मानधन वाढवण्यात यावे. नव्या शैक्षणिक धोरणातील शिक्षण व शिक्षक विरोधी तरतुदी वगळण्यात याव्यात, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून खंड दोन प्रकाशित करण्यात यावा. जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी. शिक्षकांना १०,२०,३० वर्षानंतरची आश्वासित प्रगती योजना लागु करावी. संगणक परीक्षा उत्तीर्णतेला मुदतवाढ देण्यात यावी व वसुली थांबवण्यात यावी, पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी देण्यात यावी, शिक्षकांना रजारोखीकरणाचा लाभ देण्यात यावा, वस्तीशाळा शिक्षकांची मुळनियुक्ती पासुन सेवा धरून वरीष्ठ श्रेणीचा लाभ द्यावा, शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी. केंद्र प्रमुखांची १००% पदे पदोन्नतीने शिक्षकांतुन भरण्यात यावी, निवासाची व्यवस्था होत नाही तो पर्यंत मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी.
शिक्षकांचे बरेच प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. तीन लाभाची आश्वासीत प्रगती योजना, रजा रोखीकरण यासारखे लाभ इतर कर्मचा-यांना देय अस तांना शिक्षकांनाच मात्र वंचित ठेवण्यात आलेले आहे. या व इतर प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा तर्फे राज्यभर एकाच वेळी तहसिलदारा मार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.
या प्रसंगी श्री धनराज बोडे, जिल्हाध्यक्ष , अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नागपुर सह आदि शिक्षक उपस्थित होते .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …