*क्रॉसकंट्री स्पर्धेत भारसिंगी महाविद्यालयातील चमूने पटकावली चॅम्पियनशिप*
काटोल संवाददाता – दुर्गाप्रसाद पांडे
काटोल – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या क्रॉसकंट्री स्पर्धेत अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय, भारसिंगी येथिल, लीलाराम बावने, बी.ए.द्वितीय वर्ष,अजित भेंडे एम.ए. द्वितीय वर्ष,सागर शिंदपुरे बी.ए.प्रथम वर्ष, सनी फुसाटे बी.ए.प्रथम वर्ष,कार्तिक देशमुख बी. कॉम.प्रथम वर्ष,विकेश शेंडे बी. ए.द्वितीय वर्ष, वृशिकेष वाडकर एम. ए. द्वितीय वर्ष या पुरुष खेळाडू चमूने चॅम्पियनशिप पटकावून यश संपादन करून, महाविद्यालयाचे नाव रोशन केले आहे.या उल्लेखनीय कामगिरी बद्दल व्हीएसपीएम संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.रणजितबाबू देशमुख,व्हीएसपीएम संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉ.भाऊसाहेब भोगे, व्हीसपिएम संस्थेचे कार्याध्यक्ष तथा काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख, संस्थेचे कार्यवाहक मा. युवराजजी चालखोर,व्हीएसपीएम संस्थेचे सर्व पदाधिकारी तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पवार यांनी खेळाडू आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ.मनोजकुमार वर्मा यांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या खेळाडूंच्या यशामध्ये शारीरिक शिक्षण संचालक डॉ. मनोजकुमार वर्मा, प्रशिक्षक डॉ.सुनील कापगाते,प्रा. बंटी यादव व प्रा.विनोद तरार यांनी विशेष परिश्रम घेतले.खेळाडूंच्या या यशाबद्दल प्रा.राजेंद्र घोरपडे, डॉ.साधना जिचकार, डॉ. नितिन राऊत, डॉ. श्रीकांत ठाकरे, डॉ. दादाराव उपासे,प्रा. सुरेंद्र सिनकर, डॉ. स्मिता गुडधे,प्रा.विजय रहांगडाले, डॉ.भाविक मणियार,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांनी विजयी चमुंचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Maharashtra News Media सच की आवाज